महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठं बंड?; भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार फुटण्याच्या तयारीत असल्याचा मोठा दावा भाजप नेत्याने केला आहे.
Raosaheb Danve in Jalna
Raosaheb Danve in JalnaSAAM TV

लक्ष्मण साळुंके

Jalna News : काही महिन्यांपूर्वी संपूर्ण देशानं महाराष्ट्रातील मोठी बंडाळी बघितली. आता पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठं बंड होण्याची शक्यता आहे काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार फुटण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केला आहे. यामुळं राज्यातील राजकारण ढवळून निघण्याची चिन्हे आहेत. (Maharashtra Politics)

Raosaheb Danve in Jalna
रावसाहेब दानवे अर्जुन खोतकर यांच्या भेटीला; अर्धा तास बंद दाराआड चर्चा

भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी जालन्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील राजकारणात खळबळ उडवून देणारं वक्तव्य केलं.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार फुटण्याच्या तयारीत असल्याचा दावा त्यांनी केला. शिंदे गटातील अंतर्गत नाराजीबाबतच्या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं. शिंदे गट फुटण्याआधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील आमदार पळतील, असे ते म्हणाले. (Breaking Marathi News)

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार फुटण्याच्या तयारीत असल्याचं मोठं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं. आम्ही कोणताही राजकीय पक्ष फोडणार नाही असं आम्ही म्हणत आलोत. मात्र अंतर्गत लाथाळीमुळं सरकार पडलं.

शिंदे आणि भाजप यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झालं. हे सरकार आम्हाला टिकवायचं आहे. म्हणून आम्ही शिंदे गटातला एकही आमदार भाजपमध्ये घेणार नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

Raosaheb Danve in Jalna
Shivsena News: उद्धव ठाकरेंना घाबरुन सगळे एकत्र येतील, पण ठाकरे सर्वांना पुरुन उरतील: अंबादास दानवे

आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीतले आमदार फुटण्याच्या तयारीत आहेत, असा दावा त्यांनी केला. माजी मंत्री आदित्य ठाकरेंवरही त्यांनी टीका केली. आदित्य ठाकरेंनी पातळी सोडून बोलू नये. वयाचं भान ठेवावं, असा सल्लाही दानवे यांनी यावेळी दिला. खोतकर आणि माझ्यातली कटुता आता संपली असल्याचंही दानवे यांनी स्पष्ट केलं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com