Breaking News : शिवसेना निवडणूक चिन्हाचा निर्णय अंधेरी पोटनिवडणुकीआधीच?

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीआधीच निवडणूक आयोग शिवसेना निवडणूक चिन्हाबाबतचा निर्णय घेऊ शकतं, अशी सूत्रांची माहिती आहे.
Shivsena Election Symbol
Shivsena Election Symbol Saam TV

शिवाजी काळे

Shivsena Election Symbol : नवी दिल्ली: शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबतचा निर्णय आता निवडणूक आयोगाच्या 'कोर्टात' आहे. मुंबईतील अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या आधीच निवडणूक आयोगाकडून शिवसेना निवडणूक चिन्हाबाबतचा हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पुढच्या महिन्यात म्हणजेच ३ नोव्हेंबरला मतदान होणार असून, ६ नोव्हेंबरलाच निकाल घोषित होणार आहे.

शिवसेना (Shivsena) नेमकी कोणाची? उद्धव ठाकरे यांची, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची?... याबाबतचा निर्णय अद्याप आलेला नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आता शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबतचा निर्णय आता निवडणूक आयोग देणार आहे. (Maharashtra News)

Shivsena Election Symbol
Dasara Melava 2022: "पाठीत वार करणाऱ्यांचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही", शिवसैनिकांची उर्जा वाढवणारा टीझर

दुसरीकडे, शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोग लवकरच देणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. मुंबईतील अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीआधीच हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे, असे समजते. पोटनिवडणुकीआधीच उमेदवारांना चिन्हांचं वाटप करावं लागणार आहे. त्यामुळं या निवडणुकीआधीच चिन्हाबाबतचा निर्णय होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Shivsena Election Symbol
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाण्याची नारायण राणेंची तयारी; म्हणाले...

पोटनिवडणुकीची तारीख जाहीर

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार रमेश लटके यांचे यावर्षी मे मध्ये निधन झाले. कुटुंबीयांसोबत ते दुबईला फिरायला गेले होते. तेथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. लटके हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडीचे. शिवसेनेचा मुंबईतील एक विश्वासू चेहरा अशी त्यांची ओळख.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com