Jayant Patil: शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसता येणार नाही! जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल

Jayant Patil On Farmers: कितीही प्रयत्न केले तरी आताच्या सरकारच्या माथ्यावर लागलेला शेतकरी आत्महत्येचा 'कलंक' पुसता येणार नाही, अशा शब्दांत जयंत पाटलांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
Jayant Patil
Jayant Patil Saam Tv

Maharashtra Political News:

राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यास सरकार अपयशी ठरलं आहं. कितीही प्रयत्न केले तरी आताच्या सरकारच्या माथ्यावर लागलेला शेतकरी आत्महत्येचा 'कलंक' पुसता येणार नाही, अशा शब्दांत जयंत पाटलांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. (Latest Marathi News)

एका बातमीचा आधार घेत शेतकरी आत्महत्येबद्दल जयंत पाटील यांनी ट्वीट केलं आहे की, "एकीकडे सभागृहात बोलताना मुख्यमंत्री राज्याला शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याची घोषणा करतात. दुसरीकडे मराठवाड्यात मात्र शेतकरी आत्महत्यांचा उच्चांक गाठला आहे. गेल्या आठ महिन्यात तब्बल ८६५ शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्याची आकडेवारी धक्कादायक आहे. दिवसाला सरासरी २ ते ३ शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपवले.", अशी माहिती त्यांनी दिली.

Jayant Patil
Mumbai Crime News : कर्जवसुलीसाठी फायनान्स कंपनीचा वारंवार फोन, संतापलेल्या कर्जदाराच्या कृत्याने अख्खी कंपनी हादरली

"कर्जबाजारीपणा, नापिकी, महागाईमुळे बिकट झालेली आर्थिक परिस्थिती, गेल्या वर्षी अतिवृष्टी, त्यानंतर आता दुष्काळाचे संकट या सगळ्यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात सरकार अपयशी ठरले आहे. " अशी टीकाही त्यांनी केली आहे.

राज्यात यंदा हवा तसा पाऊस पडलेला नाही. अनेक गावांमध्ये ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांनी केलेली पेरणी पावसा अभावी पिके शेतातच जळून गेलीत. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. तसेच कर्ज देखील वाढत चालले आहे. या परिस्थितीमुळे राज्यातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

Jayant Patil
Nagar Crime News : श्रीरामपूरात राडा, युवक गंभीर जखमी, दाेघे पाेलिसांच्या ताब्यात

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com