Supriya Sule News: 'मला सार्थ अभिमान..' घराणेशाहीच्या आरोपावर सुप्रिया सुळे पहिल्यांदाच बोलल्या; विरोधकांवर हल्लाबोल

Maharashtra Political News: शरद पवार यांच्या या घोषणेनंतर विरोधकांकडून घराणेशाहीचा आरोप करत जोरदार टीका केली जात आहे....
Supriya Sule News
Supriya Sule News SAAM TV

अक्षय बडवे, प्रतिनिधी....

Supriya Sule News: शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा (NCP) २५ वा वर्धापनदिन पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मोठी घोषणा केली. त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफूल्ल पटेल यांची निवड केली.

शरद पवार यांच्या या घोषणेनंतर विरोधकांकडून घराणेशाहीचा आरोप करत जोरदार टीका केली गेली. या टिकेला आता सुप्रिया सुळे यांनीच सडेतोड उत्तर दिले आहे.

Supriya Sule News
Pune-Sarata Highway Accident: पुणे- सातारा महामार्गावर कंटेनर आणि बसचा विचित्र अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपल्या कामाला सुरूवात केली आहे. त्या आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांंशी संवाद साधला, ज्यामध्ये त्यांनी घराणेशाहीच्या आरोपावरुन विरोधकांवर हल्ला बोल केला आहे. (Maharashtra Politics)

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे...

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, "घराणेशाही असली तरी मला मी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची मुलगी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. घराणेशाहीची टीका कऱणाऱ्यांच्या पक्षातील घराणेशाहीची यादी मी अनेकदा संसदेत वाचून दाखवली आहे. त्यामुळे माझ्याकडे बोट दाखवताना चार बोटे तुमच्याकडेही आहेत हे लक्षात ठेवा," असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

Supriya Sule News
Chandrapur News: पीएचडीधारकाने मागितली लाखाची खंडणी; पोलिसांनी केली गुन्ह्यात अटकेत

तसेच याबद्दल पुढे बोलताना शरद पवार यांची मुलगी असली म्हणून मला उत्कृष्ठ संसदपटूचा पुरस्कार मिळत नाही, त्यासाठी माझे कामही महत्वाचे असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, यावेळी सुप्रिया सुळे यांनी नव्या जबाबदारीबद्दल सांगताना मी आणि प्रफूल्ल भाई साहेबांना रिपोर्ट करणार आहोत, तर राज्यात मी अजित दादा, भुजबळ साहेबांना रिपोर्ट करणार असल्याची माहिती दिली. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com