Ramdas Kadam : कालपर्यंत डरकाळी फोडणारे संजय राऊत आज घाबरले का? शिंदे गटातील नेत्याचा सवाल

कालपर्यंत डरकाळी फोडणारे संजय राऊत आज घाबरले का?, याचेच आश्चर्य वाटत असल्याचे रामदास कदम म्हणाले.
Sanjay Raut vs Ramdas Kadam
Sanjay Raut vs Ramdas KadamSaam TV

जितेश कोळी, साम टीव्ही

रत्नागिरी : शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांचा पळपुटा असा उल्लेख करत कर्नाटकात जायच्या भीतीने शेपूट का घालताय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कालपर्यंत डरकाळी फोडणारे संजय राऊत आज घाबरले का?, याचेच आश्चर्य वाटत असल्याचे रामदास कदम म्हणाले. (Ramdas Kadam Latest News)

Sanjay Raut vs Ramdas Kadam
Ravish Kumar : वरिष्ठ पत्रकार रविश कुमार यांचा राजीनामा; प्रदीर्घ वर्षानंतर एनडीटीव्हीची साथ सोडली

रामदास कदम (Ramdas Kadam) हे खेड तालुक्यातील जामगे येथे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांच्याविषयी त्यांनी केलेलं हे वक्तव्य वादग्रस्त ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना बेळगाव कोर्टाने समन्स पाठवलं आहे. (Maharashtra Politics News)

संजय राऊत यांना प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव कोर्टाने समन्स बजावले आहे. तसेच त्यांना 1 डिसेंबरला न्यायालयात हजार राहण्याचे आदेश या समन्समध्ये देण्यात आले आहे. बेळगावात 30 मार्च 2018 रोजी केलेल्या भाषण प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी संजय राऊतांना मराठी माणूस पळपुटा असल्याचा संदेश देऊ नका, असा सल्ला दिला आहे.

काय म्हणाले रामदास कदम?

"मला देखील कर्नाटक न्यायालयाने समन्स काढले होते व मी सुद्धा कर्नाटकात जाऊन आलो. सीमाभागातील मराठी लोकांनी माझे तिथे स्वागत केले आणि माझ्या जामिनासाठी तिथल्याच मराठी लोकांनी मला सहकार्य केले. त्यामुळे संजयजी तुम्ही घाबरू नका आणि मराठी माणूस पळपुटा आहे असा संदेश देऊ नका, तुम्ही कर्नाटकात जा तेथील मराठी लोक तुमच्या बाजूने ठामपणे उभे राहतील", असा सल्ला देखील रामदास कदम यांनी संजय राऊत यांना दिला आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com