Sanjay Raut News: एकनाथ शिंदे आमच्याकडे परत येतील, पण आम्ही घेणार नाही...; संजय राऊतांनी कॉन्फीडन्समध्ये सांगितलं

Sanjay Raut On Eknath Shinde: संजय राऊत सध्या मालेगाव दौऱ्यावर आहेत. येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाना साधला.
Sanjay Raut - Eknath Shinde
Sanjay Raut - Eknath ShindeSaam TV

Maharashtra Political : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सातत्याने शिंदे गटावर टीका करत आहेत. राज्यात सुरू असेल्या राजकारणावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्री कोण होणार, सर्व आमदारांनी शिंदेंची साथ सोडली तर काय होणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यावर आता संजय राऊतांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली आहे. (CM Eknath Shinde)

' शिंदे गट सोडून सगळे पुन्हा शिवसेनेत येतील मात्र त्यापैकी एकनाथ शिंदे यांना आम्ही घेणार नाही, अशा शब्दात संजय राऊतांनी शिंदेवर खोचक टीकास्त्र सोडलं आहे. यात पुढे ते म्हणाले की, "राज्यात अराजकता निर्माण झाली आहे. कायदा सुव्यवस्थेचा पुरता गोंधळ उडाला आहे.आदिवासी लोक रस्त्यावर उतरलेत. राज्यात सरकार आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा कधीही घरी जावे लागेल याचा काही नेम नाही, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

Sanjay Raut - Eknath Shinde
Sanjay raut यांचा Eknath Shinde यांच्यावर हल्लाबोल! म्हणाले.... या राज्यात सरकारचं अस्तित्वात नाही!

संजय राऊत सध्या मालेगाव दौऱ्यावर आहेत. येथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाना साधला. २६ मार्च रोजी उद्धव ठाकरे यांची भव्य सभा मालेगाव येथे होणार आहे. याच सभेच्या तयारीसाठी संजय राऊत सध्या मालेगाव दौऱ्यावर आहेत. मालेगावात उपस्थितांना संबोधित करताना संजय राऊतांनी दादा भुसे यांवर देखील निशाना साधला आहे. मालेगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो गद्दारांचा नाही, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

Sanjay Raut - Eknath Shinde
Pune Crime News : बायको आणि मुलाची हत्या करत अभियंत्याने स्वत:लाही संपवलं; पोलिस तपासात धक्कादायक कारण समोर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विरोधकांकडून सातत्याने आगपाखड होताना पहायला मिळते. आज सकाळी देखील संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. यावेळी ते म्हणाले होते की, 'या राज्याला मुख्यमंत्री नाही तर मख्खमंत्री आहेत. सगळी सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहेत. मुख्यमंत्री फक्त ४०% आमदारांना एकत्र ठेवण्याचे काम करत आहेत, बाकी काही नाही. त्यांचं सरकार अस्तित्वात नाही म्हणून तर गदारोळ आणि अराजक्ता माजलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात लाल वादळ येऊन ठेपलं आहे. किती काळ तुम्ही त्यांना रोखून धरणार आहात?, असं संजय राऊतांनी म्हटलं होतं.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com