Uday Samant on Uddhav Thackeray: 'ज्यांना नैतिकता नाही ते आता नैतिकतेचे धडे द्यायला लागले', उदय सामंत यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

'ज्यांना नैतिकता नाही ते आता नैतिकतेचे धडे द्यायला लागले', उदय सामंत यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
Uday Samant, Uddhav Thackeray, Barsu Refinery Project Protest, Ratnagiri News
Uday Samant, Uddhav Thackeray, Barsu Refinery Project Protest, Ratnagiri Newssaam tv

Uday Samant on Uddhav Thackeray: सत्तासंघर्षाच्या निकालानंतर गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी आपण नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला असं म्हणाले. यावरूनच आता राजकरण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा देण्याशिवाय पर्यायच नव्हता असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. यानंतर आता उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही ठाकरेंवर टीका केली आहे.

उदय सामंत म्हणाले आहेत की, ''ज्यांना नैतिकता नाही ते आता नैतिकतेचे धडे द्यायला लागले.'' ते म्हणाले, कालच्या निकालानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे विचलित झाले आहेत. पुन्हा त्यांचा राजकीय जीवनाशी खेळायचा हा उद्योग सुरू झालेला आहे.  (Maharashtra News)

Uday Samant, Uddhav Thackeray, Barsu Refinery Project Protest, Ratnagiri News
Maharashtra Cabinet Expansion: शिंदे- फडणवीस शब्द पाळतील! 'या' आमदाराला मंत्रिपदाचा विश्वास; मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीखही सांगून टाकली (पाहा व्हिडिओ)

Uday Samant On Sanjay Raut : संजय राऊत यांनाही केलं लक्ष्य

संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना उदय अमानत म्हणाले की, ''संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत तीन महिन्याच्या आत सरकार राहणार नाही, असे सांगितले. त्याला आता जनता बळी पडणार नाही.''

Uddhav Thackeray : काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ''सुप्रीम कोर्ट निकाल देऊ शकतं, कारण त्यांचा अधिकार आहे. आता अधिकार अध्यक्ष यांच्याकडे दिला असला तरी व्हीप पक्षाच आहे, असं कोर्टाने सांगितलं. समोरच्याने आता सुधारणे आवश्यक आहे. माझी नैतिकता म्हणूण राजीनामा दिला. हापापलेल्यांना मी का फ्लोर टेस्टला समोर जावं.''

Uday Samant, Uddhav Thackeray, Barsu Refinery Project Protest, Ratnagiri News
Congress आक्रमक, जिल्हा बँक अध्यक्षांच्या गाेळीबारप्रकरणी मूल शहरात कडकडीत बंद; हल्लेखाेरांच्या अटकेची मागणी

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : फडणवीस यांचं उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले होते की, "मी नैतिकतेने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, असे उद्धव ठाकरे म्हणतात पण भाजपसोबत निवडून आल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाताना तुमची नैतिकता कुठे गेली होती."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com