Aditya Thackeray News: 'सरकारकडून अपेक्षा नाहीत; नेत्यांमध्ये मंत्रिपदासाठी भांडणे...' आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र

Maharashtra Politics News: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यानंतर आदित्य ठाकरेंनीही मंत्री- मंडळ बैठकीवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे...
Aditya Thackeray News
Aditya Thackeray NewsSaamtv

तबरेज शेख, प्रतिनिधी

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडणार आहे. एकीकडे राज्य मंडळाची बैठक पार पडत असतानाच विरोधकांनी मात्र बैठकीच्या थाटमाट- आणि खर्चावरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यानंतर आदित्य ठाकरेंनीही मंत्री- मंडळ बैठकीवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे...

Aditya Thackeray News
Sachin Aahir News | 'प्रो दहीहंडी' साठी लाखो रुपयांची उधळण, ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांचा आरोप

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

नुकताच छत्रपती संभाजीनगरचा (Chhatrapati Sambhajinagar) दौरा केला. या भागात शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. पिकांना पाणी नसल्याने शेतकरी हतबल झाला असून सरकारकडून कसलीही मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करा अशा नोटिसा येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मंत्रीमंडळ बैठकीवरुन सोडले टीकास्त्र...

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मंत्रीमंडळ बैठकीवरुनही राज्य सरकारवर टीका केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीतून काहीही अपेक्षा नाहीत. याऊलट नेत्यांमध्ये मंत्रिपदासाठी भांडणे सुरू आहेत. आजही ५० हजार कोटींच्या घोषणा होतील. मात्र घोषणा ,घोषणाच राहतात.. असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीवरुन खासदार संजय राऊत यांनीही राज्य सरकारवर निशाणा साधला होता. "ही तीन ठगांची युती आहे. मराठवाड्यात दुष्काळ असताना वारेमाफ खर्च होत आहे. खाण्या- पिण्यावर लाखो रुपयांची उधळण होत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. एक डाऊटफूल आणि दो हाफ सत्तेत आहेत, असे राऊत म्हणाले होते. (Latest Marathi News)

Aditya Thackeray News
Sanjay Raut News: 'हे एक डाउटफुल, दोन हाफ सरकार...' मंत्रीमंडळ बैठकीवरुन संजय राऊतांची खोचक टीका

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com