Ajit Pawar News: 'तो निर्णय मागच्या सरकारचा; मला कारण नसताना ट्रोल केल जातंय... कंत्राटी भरती वादावर अजित पवारांचे स्पष्टीकरण

Maharashtra Politics: काही जण कारण नसताना मला ट्रोल करत आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsSaam TV

अक्षय बडवे, प्रतिनिधी

Pune News:

राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडल्यानंतर आरोप- प्रत्यारोप वाढले आहेत. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सरकारी नोकरदाराच्या पगारात तीन कंत्राटी कामगार येतात.. असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी टीका केली होती. या मुद्द्यावरुन आमदार रोहित पवार यांनीही अजित पवारांवर निशाणा साधला होता. या टीकेला अजित पवार यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे.

Ajit Pawar News
Shambhuraj Desai News: 'अपात्रतेच्या सुनावणीत गडबड नको, दोषी असेल तर कारवाई करा..' मंत्री शंभूराज देसाईंचे विधान

काय म्हणाले अजित पवार?

शुक्रवार (१५, सप्टेंबर) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या टीकेला उत्तर दिले. काही जण कारण नसताना मला ट्रोल करत आहेत, असे ते यावेळी म्हणाले.

तसेच "विरोधकांना उकळ्या फुटतात आणि सोशल मीडियावर बातम्या ते पोहचवतात. मात्र कंत्राटी भरतीचा तो जीआर मागच्या काळातील सरकारचा आहे. त्यावर कोणाच्या सह्या आहेत ते मी दाखवू शकतो. विरोधक फक्त विरोधासाठी विरोध करत आहेत... अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली..

"मी आढावा घेत असताना आरोग्य विभाग-शिक्षण विभाग, रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ कमी आहे. मनुष्यबळ भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी टाटा कंपनीसह तीन कंपन्या निवडल्या आहेत. काही ठिकाणी ताबडतोब माणसं लागतात. मागच्या सरकारमध्ये शिक्षकभरतीत काय झालं सर्वांना ठावूक असल्याचा टोलाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लगावला. (Latest Marathi News)

Ajit Pawar News
Pandharpur News : उजनीतून भीमा नदीत दीड टीएमसी पाणी सोडणार : खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com