Maharashtra Politics : पाणी देणारा नेता हवाय की बाटली देणारा; पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे?

Beed Political News : पंकजा मुंडे म्हणतात तो राजकारणातील विलन कोण?
Pankaja Munde
Pankaja MundeSaam tv

Pankaja Munde Marathi News : घराघरात पाणी देणारा नेता पाहिजे की घराघरात चपटी बॉटल देणारा नेता पाहिजे ? असं म्हणत पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय. तसेच केंद्र सरकारची योजना आणि राज्यात सरकार आमचं तरी दुसरेच आमच्या योजनेच उद्घाटन करण्यास पुढे येतात असं म्हणत विकासाच्या मुद्द्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. (Latest Marathi News)

Pankaja Munde
Satara : छत्रपतींबद्दल आम्हांला आदर आहे, पण... राजेंच्या बालेकिल्ल्यात काय म्हणाले संजय राऊत, वाचा सविस्तर

बीडच्या (Beed) परळी येथील कौठळी गावात जल जीवन मिशन योजनेच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, की यांनी परळी शहरातील भुयारी गटार योजनेच्या नावाखाली चांगले रस्ते फोडले आणि म्हणे विकास केला अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे.

तुम्हाला नेमका कसा नेता पाहिजे? तर तुम्हाला भूषण वाटावे अशा नेतृत्वाची गरज आहे. पुढची पिढी घडवणारा नेता पाहिजे की, पुढची पिढी वाया घालवणार नेता पाहिजे. घरा घरात पाणी देणारा नेता पाहिजे ? की घरा घरात चपटीची बॉटल देणारा नेता पाहिजे? असं म्हणत पंकजा मुंडे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर निशाणा साधला.  (Maharashtra Political News)

Pankaja Munde
Faridabad Accident : वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले ते परतलेच नाही; भीषण अपघातात 6 तरुणांचा जागीच मृत्यू, कार चक्काचूर

मुंडे साहेबांच्या नंतर तुम्ही सगळे कोणाचं नाव घेता माझं. कारण तुम्हाला कुशल अन चांगला नेता तुम्हाला पाहिजे. मी निवडणुकीमध्ये हरले तेव्हा पासून तुमच्या मोबाईलवर मॅसेज येण बंद झाले. पैसे वाटणारा, तमाशा दाखवणारा, मत विकत घेणारा भ्रष्टाचार करणारा, खोटे गुन्हे दाखल करणारा, चारित्र्यहिन राजकारणातील विलन असतो. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा आक्रमक निशाणा साधला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com