Maharashtra Politics: मोठी बातमी! लवकरच मंत्रिमंडळ विस्तार; 20 आमदार मंत्री होणार, संजय शिरसाट यांची माहिती

Sanjay Shirsat On Udhav Thackeray: उद्धव ठाकरे यांना आम्ही धडा शिकवला, ज्यासाठी भाजपने (BJP) आम्हाला सहकार्य केले, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
Sanjay Shirsat
Sanjay Shirsatsaam tv

Chhatrapati Sambhajinagar: राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत आज मोठी घडामोड घडली आहे. सुप्रीम कोर्टानं 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला आहे. हा शिंदे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. तर उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का आहे. (Maharashtra Politics News)

दरम्यान निकालानंतर रखडला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी सुचक वक्तव्य केले असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, ज्यामध्ये 20 आमदार मंत्री होतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Sanjay Shirsat
Sanjay Raut News: 'परदेशातून प्रवचने देऊ नका, जनता रस्त्यावर फिरून देणार नाही..' संजय राऊतांनी नार्वेकरांना ठणकावले

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त शिवसेना शिंदे गटाने छत्रपती संभाजीनगर शहरात रॅली काढण्यात आली. यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाठ यांनी उपस्थिती लावली. या रॅली दरम्यान पत्रकारांशी बोलताना संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबद्दलही खुलासा केला आहे. (latest Marathi News)

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार...

यावेळी बोलताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी "राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल महत्वाचा खुलासा केला. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, ज्यामध्ये 20 आमदार मंत्री होतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. तसेच केंद्रिय मंत्री मंडळात 2 जण मंत्री होतील," असेही ते यावेळी म्हणाले...

Sanjay Shirsat
Akola Violence Update: अकोल्याच्या घटनेसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश, आतापर्यंत 30 आरोपींना अटक

उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा...

यावेळी बोलताना संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर (Udhav Thackeray) टीका केली. "२०१९ मध्ये शिवसेना भाजपचे सरकार येईल या आनंदात होतो, पण अचानक बदल झाल्यानं आपण भाजपसोबत जाणार नाही असं कळले. त्यानंतर भाजपने पहाटेच्या शपथविधीची जी खेळी केली, ती योग्य होती," असे ते म्हणाले.

पुढे बोलताना "उद्धव ठाकरे यांना आम्ही धडा शिकवला, ज्यासाठी भाजपने (BJP) आम्हाला सहकार्य केले" असे म्हणत संजय शिरसाट यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. (Maharashtra Politics)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com