Eknath Shinde News: 'ते स्वतःचेच वस्त्रहरण करुन घेत आहेत...' अविश्वास प्रस्तावावरुन CM शिंदेंची विरोधकांवर खोचक टीका

Cm Eknath Shinde On No Confidence Motion: मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरुन एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
CM Eknath Shinde News
CM Eknath Shinde Newssaam tv

No Confidence Motion: मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन सध्या संसदेमध्ये जोरदार घमासान सुरू आहे. याच मुद्द्यावरुन विरोधकांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. या अविश्वास प्रस्तावावर दोन दिवसांपासून चर्चा सुरू आहे. याच अविश्वास प्रस्तावावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे...

CM Eknath Shinde News
Tuljabhavani Mandir: तुळजापूरमध्ये बोगस पुजारी; भाविकांच्या फसवणूकीचे प्रकार

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

देशभरात विश्वास गमावलेल्या विरोधी पक्षाने संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडलाय. खरं तर या ठरावावर चर्चा घडवून विरोधक स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास आणि सुधारणांचा धडाका लावलेला आहे. त्यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे... असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

CM Eknath Shinde News
Ajit Pawar: पुण्यासह राज्यातील विकास कामे तातडीने मार्गी लावा; अजित पवारांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश

मुख्यमंत्र्यांचे संपूर्ण ट्वीट...

"कॉंग्रेसच्या (Congress) ५५-६० वर्षांच्या कालखंडात जेवढी विकासकामे झाली नाहीत, त्यापेक्षा अधिक विकास गेल्या ९ वर्षांत झाला आहे. जगभरात पंतप्रधानांच्या नेतृत्वाला जी मान्यता मिळत आहे, ती पाहून विरोधकांचा जळफळाट झाला आहे.

देशातील जनतेने विरोधकांवर वारंवार अविश्वास दाखवलाय. २०१४ आणि २०१९ मध्ये सामान्य नागरिकांचा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी (Narendra Modi) यांच्यावरील प्रगाढ विश्वास दिसून आला. २०२४ साली तो वृद्धिंगत होईल, याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही.

तसेच या ट्वीटमध्ये, भारताच्या नागरिकांना आता फक्त सर्वांगीण प्रगती आणि आर्थिक विकास हवा आहे. एकमेकांचे हात हाती घेऊन ऐक्याच्या घोषणा देणारे आणि पायात पाय घालून पाडण्याची संधी शोधणारे विरोधक आता कालबाह्य झाले आहेत. ते अविश्वास ठरावावर तोंडावर कसे आपटतात, हे गेल्या दोन दिवसांपासून सारा देश पाहतोय. पंतप्रधानांचे आणि एनडीएच्या घटक पक्षांचे स्थान या चर्चेनंतर अधिक बळकट होईल, यात मला तीळमात्र शंका वाटत नाही..." असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदेंनी व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com