Maharashtra Politics: मोठी बातमी! मंत्रिपदाचे आमिष दाखवून ६ आमदारांना कोट्यवधींचा गंडा; राजकीय वर्तुळात खळबळ

MLA Offers: मंत्रिपद मिळेल, पक्षनिधी म्हणून पावणे दोन कोटी रुपये द्या.. असे सांगून या आमदारांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे...
Fraud With BJP MLA
Fraud With BJP MLAsaam tv

Lure of ministership, 5 BJP MLAs cheated : राज्याच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी सध्या समोर येत आहे. राज्यातील काही आमदारांना मंत्रिपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या पैशाची मागणी केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

या फसवणूकीच्या प्रकारानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्विय सहाय्यक असल्याचे सांगत ६ आमदारांची फसवणूक केल्या प्रकरणी आता एका भामट्यास अटक करण्यात आली आहे.

Fraud With BJP MLA
Pandharpur News: मी आत्महत्या करतोय, माझा शोध घेऊ नका; मेसेस पाठवून माजी जिल्हा परिषद सदस्य बेपत्ता

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य मंत्रिमंडळाच्या (Maharashtra Politics) विस्ताराची सर्वांनाच प्रतिक्षा लागलेली असताना हे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगून मंत्रीपद मिळवून देण्यासाठी राज्यातील चार आमदारांकडे पैशाची मागणी केल्याचे समोर आले आहे..

नागपुरातील भाजपचे (BJP) आमदार विकास कुंभारे, भाजप आ. टेकचंद सावरकर यांना काही दिवसांपूर्वी हा फोन आला होता. ज्यामध्ये निरज सिंह राठोड नामक व्यक्तीने भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगत पैशाची मागणी केली.

Fraud With BJP MLA
Aditya Thackeray News: सत्ता जाते किंवा सत्ता आणायची असते तिथे दंगली घडवायच्या; आदित्य ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

मंत्रीपद मिळेल मात्र पक्षनिधी म्हणून पावणेदोन कोटी रुपये द्या. असे या आमदारांना सांगण्यात आले. मात्र आमदार विकास कुंभारे यांना संशय आला. त्यांनी याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे.

या प्रकरणात आ. तानाजी मुरकुटे आणि नारायण कुचे या राज्यातील आणखी दोन आमदारांकडेही या व्यक्तीने कोटय़वधींची मागणी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, नागपूर पोलिसांनी या भामट्याला गुजरातमधील मोरबीमधून ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com