Maharashtra Political News: राष्ट्रवादीचे कार्यकर्ते परवानगीने शिंदे गटात, जयंत पाटील यांचा दावा; ६ महिन्यांसाठी...

Jayant Patil News: सोलापूरमधील कार्यकर्त्यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबद्दल जयंत पाटील यांनी मोठे विधान केले आहे.
Jayant Patil, Eknath Shinde!
Jayant Patil, Eknath Shinde!Saam TV

Solapur NCP News: राज्याच्या राजकारणात सध्या आगामी महापालिका, विधानसभा तसेच लोकसभा निवडणूकांचे वेध लागले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरूवात केली आहे. एकीकडे सर्वच पक्ष संघटना मजबूत करण्याच्या प्रयत्नात असताना सोलापूरमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

सोलापूरमधील राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने चर्चा रंगल्या होत्या. मात्र याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र ते परवानगी घेवूनच गेल्याचे मोठे विधान केले आहे..

Jayant Patil, Eknath Shinde!
Parbhani Accident News: दुर्देवी! शिवशाही बसच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू; परिसरात हळहळ

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. ज्यामध्ये त्यांनी सोलापूरमधील कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मोठे विधान केले आहे. (Latest Marathi News)

काय म्हणाले जयंत पाटील...

याबद्दल बोलताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले की, शिंदे गटात गेलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे तात्पुरत्या काळासाठी गेले आहेत. शिंदे गटाची जोपर्यंत सत्ता आहे. तो पर्यंत काही सोयी सवलती मिळतील म्हणून ते शिंदे गटात गेले आहेत.. असा खळबळजनक दावा त्यांनी केला.

तसेच याबद्दल पुढे बोलताना "एका कार्यकर्त्याने साहेब सहा महिने जातो निधी घेऊन येतो, निधी मिळाल्यावर परत येतो", अशी परवानगी घेतल्याचेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले. जयंत पाटील यांच्या या दाव्याची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Jayant Patil, Eknath Shinde!
Shivrajyabhishek Sohala 2023 : शिवराज्याभिषेक सोहळयात यंदा 'या' कार्यक्रमांचे आयाेजन; शिरकाई देवी परिसर हर हर महादेवने दुमदुमला

अमोल कोल्हेंचा पत्ता कट होणार....

दरम्यान, यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी अमोल कोल्हेंच्या (Amol Kolhe) उमेदवारीबद्दल मोठे विधान केले. "अमोल कोल्हे हे आमचे उत्तम उमेदवार आहेत, त्यांनी लोकसभेत चांगले काम केले आहे. पण त्यांच्याव्यतिरिक्त आणखी काही चांगले उमेदवार शिरूर मतदारसंघात आहेत ज्यांचं तिथं चांगल काम आहे," असे ते यावेळी म्हणाले. त्यामुळे अमोल कोल्हेंचा शिरुरमधून पत्ता कट होणार असल्याचे बोलले जात आहे. (Maharashtra Politics)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com