Ajit Pawar Vs Sharad Pawar Live Marathi News : शरद पवारांची अध्यक्षपदी झालेली निवड ग्राह्य धरता येणार नाही, अजित पवार गटाचा दावा

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. अजित पवार यांच्यासह काही नेत्यांनी बंड पुकारल्यानंतर पक्षात दोन गट पडले आहेत.
NCP Crisis Sharad Pawar vs Ajit Pawar
NCP Crisis Sharad Pawar vs Ajit Pawar saam tv

पक्ष संघटना वाढवण्यासाठी सर्वांनी कामाला लागा, अजित पवारांचे आदेश

अजितदादा यांनी पक्ष संघटना वाढवण्यासाठी सर्वांनी कामाला लागा असे आदेश देण्यात आले सर्व आमदारांची आता विकास काम होतील त्या दृष्टीने चर्चा करण्यात आली राष्ट्रवादी कार्यकर्त्यांशी सर्व मंत्री आमदार संवाद साधणार आहेत

शरद पवार यांची २०२२ मध्ये अध्यक्ष म्हणून झालेली निवड ग्राह्य धरता येणार नाही, अजित पवार यांच्या गटाकडून दावा

अजित पवार यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून निवड

अजित पवार यांच्या गटाची निवडणूक आयोगाला माहिती

40 आमदारांचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाला सादर

30 जूनला आमदारांनी अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड केल्याचा पत्रात उल्लेख

निवडणूक आयोगाची माहिती

शरद पवारांची भाजपवर खरमरीत टीका

भाजपचं हिंदुत्व हे विषारी, माणसामाणसांत फूट पाडणारं आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.

चिन्ह जाणार नाही, जाऊ देणारही नाही, शरद पवारांनी दंड थोपटले

अनेक जण चिन्ह आमचा आहे असं सांगतात. पण काळजी करू नका, चिन्ह जाणार नाही आणि जाऊ देणारही, अशा शब्दांत शरद पवारांनी दंड थोपटले

भ्रष्टाचाराचे आरोप केले, मग ते मंत्रिमंडळात कसे? -शरद पवार

जयंत पाटील यांचा अजित पवारांना खोचक टोला, भाजपवरही टीकास्त्र

बापाचा नाद करायचा नाही, सुप्रिया सुळे कडाडल्या

हा बाप माझ्या एकटीचा नाही, माझ्यापेक्षा तुमचा जास्त आहे. बापाचा नाद नाही करायचा. बाकी काही ऐकून घेऊ, असा इशारा देतानाच महिला आहे मी. छोटंसं बोललं तर टचकन पाणी येतं. पण संघर्षाची वेळ येते, तेव्हा तीच अहिल्यादेवी, ताराराणी, जिजाऊ होते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

२०२४ मध्ये मोदींशिवाय पर्याय नाही, विधानसभेच्या ९० जागा लढवणार - पवार

मोदींशिवाय २०२४ मध्ये पर्याय नाही. विधानसभेच्या ९० जागा लढवणार आहोत. लोकसभेच्या जागाही लढवणार आहोत, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला कशाला? -अजित पवार

अजित पवारांनी शरद पवारांवरच निशाणा साधला. ते म्हणाले की, अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यायचा होता, तर दिला कशाला, असा सवाल अजित पवार यांनी केला.

अजित पवार म्हणाले, ६० वर्षे झाल्यानंतर शेतकरी मुलाला सांगतो, तू २५ वर्षांचा झालाय. तू शेती बघायची मी तुला सल्ला देईल. उद्योगपतींचीही ती पद्धत आहे. सुप्रियाशी बोललो, सुप्रिया आपण एका घरातले आहोत, एका कुटुंबातले आहोत, काहीतरी सांग, ते हट्टी आहेत. ते ऐकत नाहीत कुणाचे. असला कसला हट्ट आहे. खरंच आदर करतो आम्ही. काही आमदारांना बोलून घेतलं जातं. त्यांच्या पत्नीला फोन केला जातो. भावनिक केलं जातं.

शरद पवार साहेबांनीच शपथविधीसाठी पाठवलं होतं - अजित पवार

२०१७मध्येच भाजपसोबत चर्चा झाली होती- अजित पवार

२०१७मध्येच भाजपसोबत चर्चा झाली. खोटं बोललो तर पवारांची औलाद सांगणार नाही.  

समन्वयाआधी विरोधात बसावं लागलं - अजित पवार

समन्वयाआधी विरोधात बसावं लागलं. राष्ट्रवादीच्या आमदार खासदारांची संख्या घसरत गेली.

अजित पवार

महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे म्हणून रात्रंदिवस रक्ताचं पाणी करुन काम केलं. जातीपातीचं, नात्यागोत्याचं काम करत नाही.

अजित पवार

ही वेळ आपल्यावर का आली?

मी काम करत असताना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालो आणि घडलो.

साहेब आमचे श्रद्धस्थान आहेत.

प्रफुल्ल पटेल

आमच्या देवाने आमची भावना समजावी आम्हांला पण आशीर्वाद द्यावा

अजित पवारांच्या कार्यक्रमाला किती आमदार उपस्थित?

अजित पवार गट

१ अदिती तटकरे

२ निलेश लंके

३ सुनील शेळके

४ धर्मराव आत्राम

५ हसन मुश्रीफ

६ रामराजे निंबाळकर (आमदार नाही)

७ धनंजय मुंडे

८ अजित पवार

९ दिलीप वळसे पाटील

१० छगन भुजबळ

११ अनिल पाटील

१२ नरहरी झिरवळ

१३ संजय बनसोडे

१४ राजू कारमोरे

१५ अण्णा बनसोडे

१६ सुनील टिंगरे

१७ माणिकराव कोकाटे

१८ अनिकेत तटकरे (विधान परिषद)

१९ यशवंत माने

२० इंद्रनील नाईल

२१ बाळासाहेब आकबे

२२ राजेश पाटील

२३ शेखर निकम

२४ नितीन पवार

२५ दत्ता भरणे

२६ विक्रम काळे (विधान परिषद)

२७ संग्राम जगताप

२८ मनोहर चंद्रिकापुरे

२९ दिलीप मोहिते

३० सरोज आहिर

३१ अमोल मिटकरी (विधान परिषद)

३२ प्रकाश सोळंखे

३३ अतुल बेनके

शरद पवारांच्या बैठकीत किती आमदार उपस्थित?

आमदार- अनिल देशमुख, रोहित पवार, राजेंद्र शिंगणे, अशोक पवार, किरण लहमाटे, देवेंद्र भुयार, बाळासाहेब पाटील, अनिल देशमुख, सुमन पाटील, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, चेतन तुपे, सुनील भुसरा, राजेश टोपे, संदीप शिरसगर

खासदार- श्रीनिवास पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे

राज्यसभा खासदार- फौजिया खान, वंदना चव्हाण सुप्रिया सुळे

पवारसाहेब आमचे विठ्ठल आहेत - छगन भुजबळ

पावरसाहेब आमचे विठ्ठल आहेत, पण त्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय असं विधान छगन भुजपळ यांनी एमईटी येथे बोलताना केले आहे. हे सर्व का झाल? साहेब आमचे विठ्ठल आहेत. पण त्या विठठलाला बडव्यांनी घेरलेलं आहे. साहेबांनी त्यांना बाजूला करुन आम्हांला आशीर्वाद द्यावा, असे छगन भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी सर्व आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली.सगळ्यांना धक्का बसला. पण सगळी भाषणं होतील तसं सगळा उलगडा होईल.

आपल्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदार आहेत. काही ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत, तर काही बाहेर आहेत. सगळ्या आमदारांच्या प्रतिज्ञापत्रावर सह्या आहेत.

कायदे आम्हाला पण कळतात. कायद्याचा विचार आणि अभ्यास करूनच पक्षाने हे पाऊल टाकले आहे. नियमाच्या बाहेर जाऊन आम्ही काम कसं करू? कायदा आम्हाला पण कळतो.

काहीजण सांगतात ही कारवाई होईल, ती कारवाई होईल. आम्ही सगळ्याचा अभ्यास केला आहे. सकाळी उठलो आणि शपथविधी घेऊया असं केलं नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे काय या सगळ्याचा अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतला आहे.

अजित पवार बोलले होते पदाधिकारी नेमणूक झाली नाही. काम कस करायचं? कार्यकर्ते नसतील तर पक्ष काम करु शकत नाही. सांगून सुद्धा नेमणूक नाही. जर होत नसेल तर मी जबाबदारी घेतो पक्षाची जबाबदारी घेतो. १५ दिवस वाट पाहिली पण निर्णय काही होत नव्हते. शेवटी काही निर्णय घ्यायचे ठरवले.

वाय बी चव्हाण येथे आतापर्यंत पोहोचलेले आमदार आणि खासदार

आमदार

जयंत पाटील

अनिल देशमुख

रोहित पवार

राजेंद्र शिंगणे

अशोक पवार

किरण लहमाटे

देवेंद्र भुयार

बाळासाहेब पाटील

अनिल देशमुख

सुमन पाटील (रोहित पाटील)

जितेंद्र आव्हाड

चेतन तुपे

लोकसभा खासदार

श्रीनिवास पाटील

सुप्रिया सुळे

अमोल कोल्हे

राज्यसभा खासदार

फौजिया खान

धनंजय मुंडेंसह काही आमदार ट्रॅफिकमध्ये अडकले

अजित पवार यांच्या बैठकीसाठी २८ आमदार दाखल झालेले आहेत. तर दुसरीकडे शरद पवार यांच्या बैठकीला 11 आमदार दाखल झालेले आहेत. मात्र अद्याप धनंजय मुंडे आलेले नाहीत. ते ट्रॅफिकमध्ये अडकल्याचं सांगितलं जात आहे.

अजित पवार यांच्यासोबत जवळपास ३२ आमदार?

अजित पवार यांच्यासोबत जवळपास २० आमदार बैठकीच्या ठिकाणी निघाले आहेत अशी माहिती मिळतेय. तरएमईटी येथे अजित पवार गटाची आज बैठक होणार आहे. या बैठकीसाठी येथे आधीच १२ आमदार उपस्थित असल्याची माहिती मिळतेय. अजून काही आमदार येथे येण्याची शक्यता आहे. एमईटी कार्यक्रमाच्या ठिकाणी आधी ध्वजारोहन देखील होणार आहे.

यशवंतराव चव्हान सेंटर येथे पोहोचलेले आमदार

शरद पवार गटाची आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक होणार आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे आमदार, किरण लहमते, अशोक पवार, रोहीत पवार, देवेंद्र भुयार, राजेंद्र शिंगणे, अनिल देशमुख, प्राजक्त तनपूरे आणि बाबाजानी दुराणी हे पोहोचले आहेत.

चितपट कस करायच ते आम्ही करूच - सोनिया दुहान

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्या सोनिया दुहान यांनी अजित पवार गटाला आव्हान दिले आहे. 'पवार साहेब चेकमेटसाठी प्रसिद्ध आहेत हे लक्षात ठेवा. 1 वाजुद्या मग समजेल काय परिस्थिती आहे. मी पैलवानांच्या भागातून येते. त्यामुळे मला माहिती आहे की चितपट कस करायचं, ते आम्ही करूच. जर त्यांच्याकडे 44 आमदार आहेत, तर वाट कसली बघत आहेत. आम्ही 9 आमदारांविरोधात निवडणूक आयोगाकडे पत्र दिलं आहे, असे सोनिया दुहान म्हणल्या.

भुजबळांच्या मतदारसंघात शरद पवारांची पहिली सभा

राष्ट्रवादीत फूट पडल्यानतंर छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात शरद पवार पहिली सभा घेणार आहेत. ८ जुलै रोजी शरद पवार थेट भुजबळांच्या मतदारसंघ मध्ये जाणून जनतेला साद घलणार आहेत. मंत्री झालेल्या नेत्यांच्या मतदारसंघात शरद पवार यांनी शद्दू ठोकले आहे.

भांडुपमध्ये अजितदादांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो, शरद पवारांच्या आवाहनाला नंतरही अजित दादा गटाने लावले फ्लेक्स

अजित पवार यांच्या नवीन पक्ष कार्यालयामध्ये शरद पवार यांचे फोटो लावण्यात आले होते. या वरून शरद पवार यांनी ज्यांनी पक्षासोबत द्रोह केला आहे अशांनी माझे फोटो वापरणं चुकीचं आहे. परवानगीशिवाय माझे फोटो वापरू नयेत याची गंभीर दखल घेतली जाईल असा इशारा दिला होता. तरी देखील आता अजित पवार गटाच्या बॅनर्सवर देखील शरद पवार यांचे फोटो झळकू लागले आहेत.

भांडुप मध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा देणाऱ्या बॅनर्स वर शरद पवार वापरण्यात आलेला आहे. यासोबत ज्यांनी अजित पवार यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेतली त्यांचे फोटो देखील या बॅनरवर लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता पक्ष कार्यालयातून थेट बॅनर्सवर देखील शरद पवारांचे फोटो दिसू लागल्यामुळे आता शरद पवार पुढे नेमकं काय भूमिका घेतात हे पाहणं गरजेचं असणार आहेत.

पक्ष आणि चिन्ह दोन्ही आमचंच - उमेश पाटील जित पवार गट)

अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी पक्ष आणि चिन्ह आमचंच असल्याचा दावा केला आहेत. ते म्हणाले, 'आम्हाला जवळजवळ सगळ्यात आमदारांचा समर्थन आहे. अजित पवार यांनी सांगितलं तसं हा काही मटक्याचा खेळ नाही. सध्या राज्यात बहुमताचा सरकार असल्याने बहुमत सिद्ध करण्याची गरज नाही. जितेंद्र आव्हाड हे नौटंकी आहेत ते कॅमेरासमोर रडतात. पक्ष आणि चिन्ह दोन्ही आमचंच आहे. आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र आलो आहोत.'

अजित दादा गटाचे ४ ते ५ हजार प्रतिज्ञापत्र तयार?

शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच आमदार, खासदार, नेते आणि पदाधिकार्यासोबत बैठक करणार आहेत. यासाठी जवळपास ४-५ हजार प्रतिज्ञापत्र तयार करुन ठेवण्यात आले असून येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची जिल्हानुसार नोंदणी केली जाणार आहे.

भुजबळांच्या विरोधात शरद पवारांकडून रणनीती आखण्यास सुरुवात

भुजबळांच्या विरोधात रणनीती आखण्यास शरद पवार यांनी सुरुवात केली आहे. सुरुवातनाशिकच्या येवल्यातील राष्ट्रवादीचे जुने नेते अॅड. माणिकराव शिंदे शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीविरोधात कामगिरी केल्यामुळे 2019 मध्ये त्यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी झाली होती. आज त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन ते पवारांना पाठिंबा देणार आहेत.

शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात अर्ज दाखल

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात अर्ज दाखल करण्यात आला आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोणत्याही गटाने पक्षावर दावा केला तर आमचं म्हणणं ऐकून घ्यावं असे या अर्जात म्हटले आहे. अजित पवार यांच्या बंडणातर शरद पवार यांनी हे मोठं पाऊल उचललं आहे.

अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षावर दावा

अजित पवार विरूद्ध शरद पवार आता लढाई निवडणूक आयोगात पोहोचली आहे. दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगात अर्ज करण्यात आले आहेत. अजित पवार यांनी या अर्जातून पक्षावर दावा सांगितला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगात अर्ज दाखल केल्यानंतर अजित पवार यांच्या गटाच्या वतीने पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

अजित पवारांच्या बॅनरवरून शरद पवारांचा फोटो, पक्षाचं चिन्ह गायब

नागपूरात अजित पवार यांच्या गटाकडून लावण्यात आलेल्या बॅनर वरून शरद पवार यांचा फोटो गायब आहे. नागपूरच्या धरमपेठ भागात प्रशांत पवार यांच्याकडून हे अभिनंदनाचे हे बॅनर लावण्यात आले आहे. नागपूरात पदाधिकारी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात विभागले गेले आहे. अजित पवार गटाकडून शहरात काही ठिकाणी अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र त्यावर शरद पवार आणि राष्ट्रवादी चे घड्याळ चिन्ह ठेवण्यात आले नाही.

राष्ट्रवादी आमदार सरोज अहिरे यांची दोन्ही गटांच्या बैठकीला अनुपस्थिती

राष्ट्रवादी आमदार सरोज अहिरे यांनी नाशिकच्या आपल्या घरीच राहणं पसंत केलंय. ते जेलरोड परिसरातील आपल्या घरातच आहेत. प्रकृती अस्वस्थतेचं कारण देत अहिरे दोन्ही बैठकींना अनुपस्थित राहिले आहेत. अहिरे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहेत. मात्र अद्याप त्यांची भूमिका गुलदस्त्यात आहेत.

अजित पवारांच्या फ्लेक्सवर नरेंद्र मोदी, अमित शहाचे फोटो, पवारांचा नाही

राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी शिंदे भाजप सरकार मध्ये प्रवेश केला. या सर्व प्रकारामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात असले तरी भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांनी पुण्यातील मध्यवर्ती भागात अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनचा फ्लेक्स लावला आहे. या फ्लेक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोटो आहेत. या फ्लेक्समुळे पुणे शहरात आता विविध चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादीच्या 44 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा राज्याच्या

राजकारणातील आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीच्या 44 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यामध्ये 42 आमदार हे विधानसभेचे आहेत, तर 2 आमदार विधान परिषदेचे असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. या सर्व आमदारांनी अजित पवार यांच्या समर्थनाचं प्रतिज्ञापत्र दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केवळ 11 आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.

राष्ट्रवादीमधील आमदारांचं समर्थन कुणाला? आज होणार फैसला

राष्ट्रवादीतील अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटाकडून आज मुंबईत पक्षातील आमदार, खासदारांसह नेत्यांच्या बैठका बोलवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आजच राष्ट्रवादीमधील बहुसंख्य आमदारांचं समर्थन कुणाला याचा फैसला होणार आहे. या बैठकांसाठी राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यक्रते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेससाठी आज मोठा दिवस

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. अजित पवार यांच्यासह काही नेत्यांनी बंड पुकारल्यानंतर पक्षात दोन गट पडले आहेत. अजित पवार समर्थक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाला आहे, तर शरद पवार गटाने विरोधी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही गटांनी आज मुंबईत पक्षातील नेत्यांच्या बैठका बोलवल्या आहेत. त्यामुळे कोणत्या गटाच्या बैठकीला कोणते नेते हजर राहणार हे पाहावं लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com