Maharashtra Politics: कर्नाटक विजयानंतर 'मविआ' तयारीला! अजित पवारांनी सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला; प्रत्येक पक्षातील...

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर महाविकास आघाडीतही उत्साह संचारला आहे.
Mahavikas Aaghadi
Mahavikas AaghadiSaamtv

Ajit Pawar On Seat Allocation Formula: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठा विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीतही उत्साह संचारला आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांची एकजूट झाली असून त्या दृष्टीने निवडणुकाही एकत्र लढविण्यावर एकमत करण्यात आले.

याबद्दल बोलताना अजित पवार यांनी कर्नाटक निकालानंतर महाविकास आघाडीचाही आनंद द्विगुणित झाला असून भाजपमध्ये निराशा पसरल्याचे म्हणले आहे. तसेच यावेळी अजित पवार यांनी जागा वाटपाबद्दलही महत्वाचा खुलासा केला आहे..

Mahavikas Aaghadi
Nagpur News: अकोल्यातील घटनेनंतर नागपुरात हायअलर्ट, शहरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

काय म्हणाले अजित पवार...

"२०१४ पासून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आले कर्नाटकमध्येही कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश होता. मात्र कर्नाटकमध्ये पराभव स्विकारावा लागल्याने भाजपमध्ये निराशा पसरल्याचे," अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच या विजयामुळे महाविकास आघाडीमध्येही उत्साह संचारल्याचाही विश्वास त्यांनी बोलून दाखवला. (Latest Marathi News)

जागा वाटपाबद्दल केला मोठा खुलासा...

यावेळी अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi)जागा वाटपाबद्दलही बोलताना "मागच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी होती. पण आता ठाकरे गटसोबत आहे. त्यामुळे तिघांनी ४८ जागा वाटपांबद्दल चर्चा करावी, तसेच २८८ विधानसभेच्या जागा वाटपांवरही निर्णय घ्यायला हवा," असा खुलासा अजित पवार यांनी यावेळी केला. तसेच जागा वाटप करताना प्रत्येक पक्षातील दोन नेत्यांमध्ये बसून चर्चा होईल असेही ते यावेळी म्हणाले.

Mahavikas Aaghadi
Sanjay Raut On BJP: 'कमळाच्या पाकळ्या गळून पडल्या, ते वाचवता आलं नाही', संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

राज्यातील अकोला आणि अहमदनगरमध्ये झालेल्या तणावाबद्दलही अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी चिंता व्यक्त केली. "राज्यातील दंगलीला राज्य सरकारने आवर घालावा असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हंटलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात दंगलींचे प्रमाण वाढले आहे. या घटनांना आवर घालावा," असे अजित पवार यांनी म्हटले आहे

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com