Maharashtra Politics: लोकसभेचा 22 जागा लढवण्याचा शिंदे गटाचा निर्धार! ठाकरेंच्या खासदारांनाही गळ घालणार

Rahul Shewale On Loksabha Election: एकीकडे भाजप राज्यात संपूर्ण जागा लढवण्याची तयारी करत असताना आता शिंदे गटाने देखील जोर लावायला सुरुवात केली आहे.
Maharashtra Politics
Maharashtra Politicssaam tv

Rahul Shewale News : शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी आम्ही 22 जागा लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती दिली आहे. एकीकडे भाजप राज्यात संपूर्ण जागा लढवण्याची तयारी करत असताना आता शिंदे गटाने देखील जोर लावायला सुरुवात केली आहे.

युतीत आपल्या वाट्याला अधिक जागा याव्या यासाठी शिंदे गटांकडून जोर लावला जात आहे. गजानन किर्तीकर यांनी भाजपमध्ये आम्हाला सापत्न वागणूक मिळत असल्याचे म्हटले होते, तर दुसरीकडे राहुल शेवाळे यांनी 22 जागांवर लढण्याची तयारी सुरु असल्याची माहिती दिली आहे.

खासदार राहूल शेवाळे म्हणाले, आम्ही लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीय. मागील निवडणुकीत शिवसेनेने ज्या २२ जागा लढवल्या होत्या, त्या पुन्हा लढवण्याचा निर्धार आम्ही केला आहे. सध्या आम्ही २२ जागा लढवण्याची तयारी करत आहोत, आमचे सर्व १३ विद्यमान खासदार यासाठी तयारी करत आहेत.

Maharashtra Politics
Shivsena Leader on BJP: 'आम्हाला भाजपकडून सापत्न वागणूक मिळत आहे', शिंदे गटातील वरिष्ठ नेत्याचं मोठं वक्तव्य

राहुल शेवाळे म्हणाले, ठाकरे गटाकडे जे खासदार आहेत त्यांनाही आम्ही आमच्याकडे आणायचा प्रयत्न करतोय. ज्या चार जागा आम्ही हरलो होतो, तिथे निरिक्षक पाठवून आढावा घेणार आहोत. गजानन किर्तीकर काय बोलले माहिती नाही. अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

विरोधकांचा विरोध हा दुर्दैवी आहे. संपूर्ण कार्यक्रम लोकसभा अध्यक्षांच्या अखत्यारीत होतोय. त्यांना संसदीय कामकाजाची माहिती आहे का? उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे विचार सोडून दिले. त्यांचे विचार ऐकले नाहीत. आता त्यांच्यासोबत नवीन बाळासाहेब (प्रकाश आंबेडकर) आहेत. किमान त्यांचा तरी सल्ला त्यांनी मानावा.

संजय राऊत यांनी आमच्या बैठकीत उद्धव ठाकरे हे पीएम पदाचा चेहरा असतील असं सांगितले होते, आता ते राहूल गांधी यांना पीएम पदाचा चेहरा मानत असतील हे दुर्दैव आहे असा टोला देखील त्यांना लगावला. भाजप आणि शिवसेनेते मतभेत निर्माण झाले आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण शिवसेनेच्या शिंदे गटाचे वरिष्ठ नेते आणि खासदार गजाजन किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबच्या बैठकीत भाजपची तक्रार केली आहे. (Breaking News)

Maharashtra Politics
chhattisgarh News: अधिकाऱ्याचा प्रताप, शेतकऱ्यांचा संताप! IPhone साठी २१ लाख लिटर पाणी वाया घालवले; काय आहे प्रकरण?

गजानन किर्तीकरांचं मोठं वक्तव्य

एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही शिवसेनेत आलो आहोत. आम्ही आता एनडीएचे घटक आहोत. त्यामुळे आमची देखील कामं झाली पाहिजेत. मात्र घटक पक्षाला सापत्न वागणूक मिळत असल्याचं मोठं वक्तव्य गजाजन किर्तीकर यांनी केलं आहे. (Latest Political News)

ज्यावेळी सत्तासंघर्ष झाला त्यावेळी आम्ही 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो. भाजप आणि आम्ही एकत्र मिळून आमचं सरकार आहे. त्यामुळे आता आम्ही NDA चा भाग आहोत. त्यामुळे आता आमची कामं झाली पाहिजे. मात्र येथे आम्हाला सापत्न वागणूक मिळते अशी नाराजी गजानन कीर्तिकर यांनी दर्शवली. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com