
अमर घटारे
Ravi Rana Vs Nitin Deshmukh : आमदार नितीन देशमुख आणि आमदार रवी राणा यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. रवी राणा हे बायकोच्या जीवावर राजकारण करत असल्याची घणाघाती टीका देशमुख यांनी केली होती. आता या टीकेला राणा यांनी रोखठोक उत्तर दिलं आहे.
आमदार रवी राणा यांनी आमदार नितीन देशमुख यांच्यावर पलटवार केला आहे. याआधी देशमुख यांनी रवी राणांवर टीकास्त्र सोडलं होतं. आमदार रवी राणा हे बायकोच्या जीवावर राजकारण करत असल्याची टीका देशमुख यांनी केली होती. याच टीकेला राणा यांनी उत्तर देतानाच, उद्धव ठाकरे यांच्यावरही नेम साधला आहे. (Latest Marathi News)
काय म्हणाले रवी राणा?
उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे - जे लोक आहेत, त्यांच्या पापाचा घडा भरला आहे. जे काही माझ्याविरोधात वक्तव्य करत आहेत, हे बिनातेलाचे दिवे आहेत. ते फडफड करत असतात. त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही, असे राणा म्हणाले.
ज्या व्यक्तीने माझ्यावर टीका केली त्याला माझं सांगणं आहे की, ज्याने विधानभवनाच्या गेटवर पोलिसांना मारहाण केली, त्याच्यावर 353 कलमान्वये गुन्हा दाखल आहे. हे कायद्याचे राज्य आहे. त्यामुळे कायद्याच्या विरोधात जे कोणी काम करेल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची पूर्ण ताकद या सरकारमध्ये आहे, असा इशाराही राणा यांनी देशमुखांना दिला. (Tajya Batmya)
'उद्धव ठाकरेंसोबत तीनच जण राहतील'
आमदार रवी राणा यांनी यावेळी देशमुखांवर पलटवार करतानाच, उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच लोक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यापैकी तीनच जण त्यांच्यासोबत राहतील, असा टोला राणा यांनी लगावला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.