
Uddhav Thackeray Rally In Jalgaon: शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) आज जळगाव दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या उद्घाटनानंतर ठाकरेंची जाहीर सभा झाली. या सभेतून ठाकरेंनी शिंदे- फडणवीस सरकारसह पंतप्रधान मोदींवरही घणाघात केला.
काय म्हणाले ठाकरे?
"स्वातंत्र्यलढ्यात काहीही योगदान नसलेली लोक फक्त नेते चोरुन मिरवण्याचे काम सध्या करत आहेत. तिकडे वल्लभभाई, सुभाष बाबू आणि आता माझे वडील चोरायला निघालेत," असा घणाघात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केला. "वल्लभभाई पटेलांचा हजारो कोटींचा पुतळा बांधला पण त्यांच्या कामगिरीच्या जवळही ते फिरकू शकत नाहीत," असेही ते यावेळी म्हणाले.
भाजपमध्ये सगळे उपरे...
सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही (Devendra Fadanvis) जोरदार टीका केली. " कधीकाळी युतीचे वैभवशाली दिवस होते. नाथाभाऊ, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनांसारखे नेते एकत्र दिसायचे, मात्र सध्या भाजपमध्ये सगळे उपरे आहेत फडणवीसांनी निष्ठावान नेते संपवले आणि उपरे उरावर बसवले," असा आरोप त्यांनी केला.
जालना कांड...
दरम्यान, जालन्यातील (Jalna) आंदोलन कर्त्यांवर झालेल्या लाठीचारावरुन उद्धव ठाकरेंवर राज्य सरकारवर टीका केली. "शांततेनं उपोषण करत होते. असे काय चुकले की त्यांना दणादण मारत सुटले, जालियानबाला हत्याकांड झाले तसेच हे जालना कांड... असा घणाघात त्यांनी केला. तसेच मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जायला वेळ आहे, मात्र जरांगे पाटील उपोषणाला बसलेत त्यांच्याकडे जायला वेळ नाही, असा टोलाही एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) लगावला. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.