Kalyan Politics : विधानसभेची संधी हुकली, आता थेट भिडणार? सुभाष भोईर यांच्या 'भावी खासदार' बॅनरची चर्चा

Loksabha Elections 2024 : अंबरनाथ शहरात सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनर्सवर भोईर यांचा 'भावी खासदार' असा उल्लेख करण्यात आला आहे.
Loksabha Elections 2024, Subhash Bhoir, Eknath Shinde, Uddhav Thackeray, political news
Loksabha Elections 2024, Subhash Bhoir, Eknath Shinde, Uddhav Thackeray, political newssaam tv

Ambernath-Kalyan Political News : ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा संपर्कप्रमुख सुभाष भोईर यांनी कल्याण लोकसभेची जागा लढवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

एकीकडे महाविकास आघाडीत ठाणे आणि कल्याणची जागा ठाकरे गटाला सोडण्याच्या हालचाली सुरू असतानाच, दुसरीकडे कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ (Ambernath) शहरात सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनर्सवर भोईर यांचा 'भावी खासदार' असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या बॅनर्सची जोरदार चर्चा होत आहे. (Latest Marathi News)

२०१९ मध्ये संधी हुकली

सुभाष भोईर हे २०१४ साली कल्याण ग्रामीण विधानसभेतून शिवसेनेच्या तिकीटावर आमदार झाले होते. मात्र २०१९ साली विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट देण्यात आलं नाही. कल्याण-डोंबिवलीचे नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना संधी देण्यात आली होती. त्या निवडणुकीत रमेश म्हात्रे यांचा पराभव होऊन मनसेचे राजू पाटील हे आमदार म्हणून निवडून आले होते.

Loksabha Elections 2024, Subhash Bhoir, Eknath Shinde, Uddhav Thackeray, political news
Maharashtra Political News: पंकजा मुंडे पक्ष सोडून जातील का? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितलं

श्रीकांत शिंदेंना शह देण्याचा प्रयत्न?

मागील विधानसभा निवडणुकीत तिकीट दिलं नसल्यानं सुभाष भोईर हे एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी 'उठाव' केल्यानंतर सुभाष भोईर यांनी मात्र ठाकरे गटातच राहणे पसंत केले होते. इतकेच नव्हे, तर कल्याण लोकसभा मतदारसंघाचं संपर्कप्रमुखपद देखील त्यांना देण्यात आले होते. यानंतर आता सुभाष भोईर यांनी थेट श्रीकांत शिंदे यांनाच शह देण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.

Loksabha Elections 2024, Subhash Bhoir, Eknath Shinde, Uddhav Thackeray, political news
Sushma Andhare on Sanjay Shirsat: संजय शिरसाट उर्मट, असभ्य आणि असंसदीय माणूस; सुषमा अंधारे भडकल्या

लोकसभेची तयारी

सुभाष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ शहरात लावलेल्या बॅनर्सवर त्यांचा 'भावी खासदार' असा उल्लेख करण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपात ठाणे आणि कल्याण या लोकसभेच्या दोन जागा ठाकरे गटाला सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तसं झालं, तर आपल्यालाच लोकसभेचे तिकीट मिळावं आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाचा वचपा काढता यावा, असा सुभाष भोईर यांचा प्रयत्न असू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com