Maharashtra Politics: "मित्रा"साठी सरकारी तिजोरीतून कोट्यवधींची उधळपट्टी... शासनाच्या निर्णयावर विरोधक आक्रमक

Maharashtra Institute for Transformation News: मित्रा च्या (महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन) नवीन कार्यालयावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsNews

Vijay Wadettiwar News:

'मित्रा' च्या(महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन) नवीन कार्यालयावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. शिंदे सरकार 'मित्रा' यांचे नवे कार्यालय मुंबईतील नरिमन पॉईंट भागात हलवत आहे, ज्याचे भाडे दरमहा २१ लाख रुपये असेल. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उडवली आहे.

Maharashtra Politics
Dhule Nandurbar Bridge: चार कोटी पाण्यात! 3 राज्यांना जोडणारा तापी नदीवरील पूल कोसळला

काय आहे प्रकरण?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 'मित्रा'चे नवे कार्यालय मुंबईतील (Mumbai) सर्वात महागड्या नरिमन पॉइंट भागात असलेल्या निर्मल भवनात स्थलांतरित करण्यात आले आहे. मित्राच्या नवीन कार्यालयाचे एकूण क्षेत्रफळ ७९२० चौरस फूट आहे.

या नवीन कार्यालयासाठी राज्य सरकारने दरमहा २१,३८,४०० रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी या कार्यालयाच्या भाड्यात ५ % ने वाढ केली जाणार आहे. यावरुन आता विरोधकांनी टीका केली आहे.

विजय वडेट्टीवार यांची टीका...

मुख्यमंत्र्यांच्या मित्राच्या नवीन कार्यालयासाठी राज्य सरकार महिन्याला तब्बल २१ लाख रुपये म्हणजे वर्षाला २ कोटी ५६ लाख रुपय भाडे देणार असून ही सरकारी पैशांची उधळपट्टी आहे. मंत्रालयासमोर असलेल्या नवीन प्रशासकीय इमारतीत जागा कमी पडत असल्याचे कारण पुढे करत सरकारने हा निर्णय घेतला.. अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे.

तसेच मित्रा संस्थेवर मुख्यमंत्र्यांनी आपल्या मित्राची वर्णी लावली असून आता या मित्राला बसण्यासाठी कोट्यवधी रुपये सरकारी तिजोरीतून देऊन ऐसपैस कार्यालयही देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खाजगी क्षेत्रात असलेल्या आपल्या मित्र परिवारातील लोकांवर सरकारी तिजोरीतून उधळपट्टी सुरू असल्याचे चित्र आहे... असा आरोपही त्यांनी केला आहे.

काय आहे मित्रा?

११ नोव्हेंबर २०२२ रोजी एकनाथ शिंदे (Eknath Shinde)- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारने मित्राची स्थापना केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 'मित्रा'चे अध्यक्ष आहेत, तर ठाण्यातील विकासक अजय आशर हे उपाध्यक्ष आहेत. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या आकडेवारीचे विश्लेषण करणे, त्यांच्यात समन्वय निर्माण करणे आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियनवर नेण्याबरोबरच प्रकल्पांवर काम करण्यासाठी 'मित्रा'ची स्थापना करण्यात आली.

'मित्रा' यांचे पहिले कार्यालय १२०० चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या नवीन प्रशासन इमारतीत होते. जुनी जागा कामासाठी अपुरी पडत असल्याने नवीन कार्यालयासाठी मित्राच्या वतीने शासनाकडे मागणी करण्यात आली होती. (Latest Marathi News)

Maharashtra Politics
Dhule Nandurbar Bridge: चार कोटी पाण्यात! 3 राज्यांना जोडणारा तापी नदीवरील पूल कोसळला

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com