पुराच्या पाण्यात आई झाली वासुदेव; आजारी चिमुकल्याला घेऊन आईचा नदीच्या पुरातून जीवघेणा प्रवास

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.
Buldhana Latest News
Buldhana Latest News Saam Tv

बुलढाणा: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस (Rain) सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातही नद्यांना पूर आला आहे. पूर्णा नदीला पूर आल्याने नदीने पात्र सोडून आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरले आहे, तर काही गावांना पाण्याचा वेढा पडला आहे. या पूरातून गावाबाहेर जाण्यासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून कसरत करावी लागत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीतील एका आईचा आणि लहान चिमुकल्याच्या टायर ट्युबवरील प्रवासाचा एक व्हिडिओ (Video) समोर आला आहे.

पूर्णा नदीला (River) पूर आल्याने विश्वगंगा नदीच्या पुराने काळेगावाला यावर्षीही वेढा घातला आहे, तीन दिवसांपासून गावाला वेढा पडला असून जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे. आजारी रुग्णांना रुग्णालयात न्यायचे कसे असा प्रश्न काकेगाव वासियांना पडला आहे. आज सकाळी काळेगावातील एक छोटाचा चिमुकला जागीच खाली पडला, त्याच्या डोक्याला मोठी इजा झाली. रक्त वाहायला लागले, घरातील मंडळी घाबरली त्या चिमुकल्याला तात्काळ उपचाराची गरज होती. त्याला तालुक्याच्या ठिकाणी रुग्णालयात न्यावे लागेल म्हणून गावातील काही तरुणांनी त्याला पुराच्या पाण्यातून एक टायर ट्यूब तयार केले. त्या ट्यूब वर महिला व बालकाला बसविले, व त्यावरुन पुराच्या पाण्यातून प्रवास सुरू केला.

Buldhana Latest News
Jalna News : बायको माहेरी गेली, परत आणा; जालन्यात चक्क टॉवरवर चढला नवरा

पुरातून जिवघेना प्रवास करीत त्या महिला व बालकाला मलकापूर येथे घेऊन आले.आणि रुग्णालयात भरती केले. त्या बालकावर डॉक्टरांनी उपचार सुरु केले आहेत. बालकावर उपचार करण्यासाठी मलकापूर येथील रुग्णालयात (Hospital) तातडीने घेऊन जाण्यासाठी बाळाला व त्याच्या आईला टायरट्यूबवरुन २५ फूट पाण्यातून जीवघेणा प्रवासाचे व्हिडिओ (Video) चांगलाच व्हायरल झाला आहे. याबाबत तहसीलदार राजेंद्र सुरडकर यांनी सांगितलं की, या गावात पोहचण्यासाठी आम्ही युद्ध स्तरावर प्रयत्न करत असून, याठिकाणी आताच एक साधी बोट लावण्यात आली आहे. आता अंधार असल्याने ही बोट सकाळी कार्यान्वित होणार आहे. असे असंख्य रुग्ण या गावात अडकले असण्याची भीती व्यक्त होत आहे.

Buldhana Latest News
एक मॅच खेळाला नाही, पण जसप्रीत बुमराहला मोजावी लागली मोठी किंमत

दरवर्षी अशी पूर परिस्थिती होत असल्याने काळेगावाचा कित्येक दिवस संपर्क तुटत असतो. याकडे जिल्हा प्रशासने डोळेझाक करीत असल्याचा आरोप काळेगाव वासियांनी केला आहे. कायमस्वरूपी आमची ये- जा करण्यासाठी एक उंच पूल तयार करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरवर्षी जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने जिल्हा प्रशासन यावर कोणती उपाययोजना करते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com