sindhudurg rain
sindhudurg rainsaam tv

Rain Update Live : खदान तलावात दोन तरुण बुडाले; एकाचा मृतदेह सापडला, शोधकार्य सुरू

मुंबई आणि उपनगरांत सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक भागांत पावसाचं पाणी साचलं आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली.

खदान तलावात दोन तरुण बुडले; एकाचा मृतदेह सापडला, शोधकार्य सुरू

Summary

आज,मंगळवारी दहिसर पोलीस ठाणे हद्दित खदान तलाव येथे, बोरवली पश्चिम येथील सात तरुण अंदाजे २५ वर्ष वयोगटातील तलावात पोहण्यासाठी आले होते. त्यामधील दोन तरुण बुडाले असून एकाचा मृतदेह सापडला आहे. फायर ब्रिगेडच्या वतीने दुसऱ्या युवकाचा शोध कार्य चालू आहे. बाकी पाच युवक सुखरूप आहेत.

नागरिकांनो सावधान! राजापुरात पुन्हा एकदा पुरजन्य परिस्थिती

Summary

रत्नागिरी : राजापूरमध्ये पुन्हा एकदा पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कोदवली नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे. तर अर्जुना नदीचं पाणी पात्राबाहेर आल्यानं राजापूरमध्ये पुन्हा दुस-यांदा पुरस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील बाजारपेठेत पाणी शिरलं आहे. तर जवाहर चौकात देखील पुराचं पाणी शिरलय सलग दुस-या दिवशी राजापूरमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे.पुराचा धोका लक्षात घेऊन शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती.राजापूर तालुक्यात आज दिवसभरात 134.25 मिमी इतक्या पावसाची नोंद झालीय.

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई महापालिका, रेल्वे यांनी समन्वय ठेवावा : मुख्यमंत्री

Summary

मुंबई शहर व उपनगरात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली. मुंबई शहर उपनगरात गेले 24 तासात सुरू असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.

शिंदे म्हणाले, रेल्वेचे २५ स्पॉट आहेत जिथे पावसामुळे रेल्वे बंद झाल्यानंतर नागरिकांची अडचण होवू नये यासाठी उपनगरी रेल्वे विभाग, बेस्ट, मुंबई महापालिका यांनी समन्वय साधून लोकांना पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी. तसेच त्यांना नाश्ता पाणी याची देखील सोय करावी जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही.पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने तत्काळ कार्यवाही करावी.

ठाण्यात जोरदार पाऊस; मुंब्रा बायपास रोडवर दरड कोसळली

Summary

ठाण्यातील मुंब्रा परिसरातील मुंब्रा बायपास रोड वर दुपारी 3 वाजून 31 मिनिटांच्या दरम्यान दरड कोसळल्याची घटना घडली आहे. पनवेलहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर टोल नाक्याजवळ ही दरड कोसळली आहे. सदर दरड ही मोठी नसल्याने कुठलीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. या घटनेत मुंब्रा डोंगरावरील माती पावसामुळे रस्त्यावर आली आहे. या बाबतची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाल्यानंतर सहाय्यक आयुक्त मुंब्रा प्रभाग समिती, कार्यकारी अभियंता, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान १- रेस्क्यू वाहन आणि १- फायर वाहनासह घटनास्थळी उपस्थित झाले असून दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षास दिली मुख्यमंत्र्यांनी भेट

Summary

मुंबई महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली.यावेळी शिंदे यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आढावा घेतला व सूचना केल्या.

मुंबई शहर आणि उपनगरामध्ये असलेल्या 5000 सीसीटीव्हीद्वारे शहरात पडणाऱ्या पावसाच्या सद्यस्थितीवरती पूर्णपणे लक्ष ठेवण्यात येते याबाबत आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी माहिती दिली. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता,महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, आशिष शर्मा, डॉ. संजीव कुमार, पी.वेलारासू, आपत्कालीन संचालक महेश नार्वेकर, प्रमुख अधिकारी संगीता लोखंडे , उपायुक्त यांसह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पंढरपुरात जोरदार पाऊस; वारकऱ्यांची उडाली तारांबळ

Summary

पंढरपूर शहर व परिसरात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे . मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊसाचे जोरदार आगमन झाले आहे.जोरदार झालेल्या पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते.अचानक आलेल्या पावसामुळे वारकर्यांची मात्र तारांबळ उडाली.

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; NDRF च्या दोन तुकड्या रवाना

Summary

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. NDRF च्या दोन तुकड्या कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. आज सायंकाळ पर्यत NDRF च्या तुकड्या कोल्हापूरात दाखल होणार आहे. जोरदार पावसामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा फटका; कुंभार्ली घाटात दरड कोसळली

Summary

रत्नागिरीला जोरदार पावसाचा फटका बसला आहे. धुवांधार पावसामुळे कुंभार्ली घाटात दरड कोसळली आहे. चिपळूण - कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याने घाटात एकेरी वाहतूक सुरू आहे. जेसीबीच्या सहायाने दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे .

सिंधुदुर्गात धुवांधार पाऊस; निर्मला नदीला मोठा पूर

Summary

सकाळपासून सिंधुदुर्गात चांगलाच पाऊस कोसळत असून कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे निर्मला नदीला मोठा पूर आला असून आंबेरी पुलावर पाणी आले आहे. त्यामुळे पुढील 27 गावांचा संपर्क तुटला आहे. या पुराचा फटका शाळकरी मुलांना बसला असून मूले अडकून पडली आहेत, तर वाहन चालकांचाही खोळंबा झाला आहे.सह्याद्री पट्ट्यात पावसाचा जोर मोठा असल्यामुळेचं निर्मला नदीला पूर आला आहे.

मुंबई, उपनगरांत तुफान पाऊस, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

मुंबई आणि उपनगरांत सकाळपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक भागांत पावसाचं पाणी साचलं आहे. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली. तर पावसाचा फटका बसल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक उशिराने धावत आहे.

महाडमध्ये जोरदार पाऊस, जमिनीला भेगा

पावसामुळे महाड तालुक्यातील बावळे गावपरिसरातील जमिनीला भेगा.

संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्र्यांचे सतर्कतेचे आदेश.

अतिवृष्टीदरम्यान मदत कार्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेऊन, एनडीआरएफ तसेच इतर यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश.

ठाणे जिल्ह्यावरील पाणीकपातीचं संकट टळलं

बारवी धरणक्षेत्रात जोरदार पाऊस, बारवी धरणक्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग.

संपूर्ण जून महिन्यात पावसानं दाखवली होती पाठ.

परशुराम घाट वाहतुकीसाठी बंद

रत्नागिरी - मुसळधार पावसामुळं मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाट आठ दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार

नांदेडमध्ये कोसळधार

नांदेड - नांदेडमध्ये जोरदार पाऊस, सहस्त्रकुंड धबधबा वाहू लागला, पर्यटकांसाठी पर्वणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com