
पावासाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठं वृत्त समोर आलं आहे. राज्यात गणरायाच्या आगमनाबरोबर पावसाने हजेरी लावली. आज राज्यातील अनेक भागात पाऊस बरसला. त्यानंतर आता राज्यातील काही भागात पुढील ४ ते ५ दिवस पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच पावसामुळे शेतकऱ्यांवरील संकटही दूर होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा आता उत्तर पूर्व बंगाल खाडीकडे सरकला आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामाने विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात २४ सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर विदर्भात २३ सप्टेंबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आहे. महाराष्ट्रासहित गुजरात आणि ओडिशामध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबई आणि ठाण्यातही जोरदार पाऊस
पावसाने काल रात्रीपासून मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण,उल्हासनगर, बदलापूर भागात हजेरी लावली. तर आज मंगळवारी देखील अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्ये मुसळधार पाऊस झाला. शहापूर भागातही पावसाने हजेरी लावली. तर नाशिक आणि पुण्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.
दरम्यान, आज देशातील काही राज्यात पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर देशात उद्या देखील काही भागात पावसाची शक्यता आहे. उद्या गुजरातमध्येही काही भागात पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये काही भागात २० आणि २२ सप्टेंबर रोजी पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगाल आणि सिक्किममध्येही २० सप्टेंबर रोजी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काल देशात सर्वाधिक पाऊस गुजरातच्या गोधरामध्ये नोंदविण्यात आला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.