Maharashtra Rain Update: पावसाने फिरवली राज्याकडे पाठ; कमबॅक केव्हा? हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

Maharashtra Rain Update: पावसाने राज्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याचदरम्यान, हवामान विभागाने पावसासंदर्भा महत्वाची माहिती दिली आहे.
Maharashtra Rain Alert Weather Updates Paus
Maharashtra Rain Alert Weather Updates PausSaam TV

Maharashtra Rain Update:

राज्यात जुलै-ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला अनेक भागांना पावसाने धू-धू धुतलं. यानंतर ऑगस्टमध्ये मुसळधार पावसाने पुन्हा विश्रांती घेतली. पावसाने राज्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याचदरम्यान, हवामान विभागाने पावसासंदर्भा महत्वाची माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

हवामान विभागने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४८ तासांत राज्यातील अनेक भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाचा सरी कोसळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही भागांना यलो अलर्ट जारी केला आहे.

Maharashtra Rain Alert Weather Updates Paus
Dombivli Crime News : गॅलरीतून पडून महिलेचा मृत्यू; महिनाभरानंतर प्रकरणाला धक्कादायक वळण

कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरातही तीन दिवस हलक्या पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. (News on Maharashtra Rain Updates in Marathi)

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागने व्यक्त केली आहे. तर सप्टेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यात ८ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीत सरासरी किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. दरम्यान, राज्यात पावसाळा सुरू झाल्यापासून केवळ ७ टक्के पावसाची तूट दिसत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्याची गती वाढली आहे. त्यामुळे शनिवारपासून राज्यात बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे .

मोठ्या ब्रेकनंतर मुंबईत पावसाला सुरूवात

मुंबईत मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस कोसळला. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटेपासून पाऊस कोसळत होता.

Maharashtra Rain Alert Weather Updates Paus
Phone tapping Case: गुन्हा खरा पण आरोपी सापडत नाही, सीबीआयचा खुलासा; विरोधकांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका

महिनाभराच्या विश्रांतीनंतर बीडमध्ये पावसाची हजेरी, शेतकऱ्यांना दिलासा..

महिनाभराच्या विश्रांतीनंतर बीडमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील बीड शहरासह माजलगाव, वडवणी, गेवराई यासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आज पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

तर या हलक्याशा पावसाने बीडकरांचे मात्र हाल झाले. शहरातील मुख्य महामार्ग असणाऱ्या बीड -अहमदनगर रोडवरील नाल्या रस्त्यावर आल्याने वाहनधारकांना मात्र मोठी कसरत करण्याची वेळ आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com