नाशिक, यवतमाळसह राज्यातील काही भागात पावसाचा हाहाकार; पिकांचे मोठे नुकसान

१५ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे.
Maharashtra Rain
Maharashtra RainSaam Tv

नाशिक: राज्यात गेल्या काही दिवासापासून पावसाचा (Rain) जोर कमी झाला होता. १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. आज यवतमाळ, नाशिक, बीडसह आदी भागात दोरदार पाऊस झाला आहे. दिवसभर ढगाळ वातावरणाचे दुपारी दरम्यान पावसाला सुरुवात झाली.आधीच सतत पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असताना पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.

आज दुपारपासूनच नाशिक शहरात आणि जिल्ह्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचे (Rain)आगमन झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी पावसाची संततदार सुरू होती, त्यानंतर जिल्ह्यातील अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होऊन नद्या, नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

Maharashtra Rain
Mumbai Bank : महाविकास आघाडीला मोठा धक्का; भाजपची खेळी ठरली यशस्वी

यवतमाळ जिल्ह्यात विजेच्या कडकडासह जिल्ह्यात पुन्हा पावसाचाने दमदार एंट्री केली. १५ दिवसाच्या विश्रांती नंतर पुन्हा पाऊस पडला. दिवसभर ढगाली वातावरणाचे दुपारी दरम्यान पावसाला सुरुवात झाली. आधीच सतत पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असताना पुन्हा पावसाने हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Maharashtra Rain
देशी दारुचे दुकान बंद करण्यासाठी महिलांचा एल्गार, रास्तारोको आंदोलनात शेकडो महिलांचा सहभाग

बीडच्या वडवणी तालुक्यातील सोन्नाखोटा येथील अप्पर कुंडलिका मध्यम प्रकल्प ९२ टक्के भरला आहे. यामुळे प्रकल्पाचे पाचही दरवाजे १.३ मी उघडले असून कुंडलिका नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. यामुळे कुंडलिका नदीकाठच्या सोन्नाखोटा, चिंचवण, कोठरबन, पिंपळटक्का, पहाडी-दहिफळ गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये व आपले जनावरे नदीपात्रात सोडू नये, असे अवाहन सहाय्यक पाटबंधारे विभागाचे अभियंता सिध्दांत शिंदे यांनी केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com