Unseasonal Rain: राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकटासह वादळी वाऱ्यासोबत पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, गहू, हरभऱ्यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Maharashtra Rain Update
Maharashtra Rain UpdateSaamtv

Maharashtra Rain Update: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत असून हवामान विभागाने राज्यभरात ६, ७ ते ८ मार्चला अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज सर्वत्र होळी साजरी केली जात असतानाच अनेक ठिकाणी विजांच्या कडकटासह वादळी वाऱ्यासोबत पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कांदा, गहू, हरभऱ्यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

पुण्यात अवकाळी पाऊस..

 दुपारी चार वाजल्यापासून ढग दाटून आल्यानंतर सोमवारी (ता.०६) सायंकाळी सहाच्या दरम्यान तळेगावात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.अचानक आलेल्या पावसामुळे पेटलेल्या होळ्या पाण्याचा शिडकावा होऊन विझल्या. (Pune)

Maharashtra Rain Update
Crime News: पीएमपी बसमध्ये चोरी, महिलेच्या पर्समधून १ लाख ६५ हजार रुपयांचे दागिने लांबविले

धुळे जिल्ह्यात पावसाची हजेरी-

धुळे जिल्ह्यात दुपारपासून गारपिटीसह साक्री तालुक्यातील बहुतांश ठिकाणी वादळी वारा व मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. जवळपास एक ते दीड तास चाललेल्या या मुसळधार अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, यामध्ये गहू, हरभरा, त्याचबरोबर कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

माथेरानमध्येही पाऊस: माथेरानमध्येही संध्याकाळच्या सुमारास पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसाने नागरिक आणि पर्यटकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. तसेच पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा मिळाला.

Maharashtra Rain Update
Amol Mitkari : अमोल मिटकरींना खासदार व्हावसं वाटतंय, जाहीररित्या व्यक्त केली इच्छा; लवकरच पुढची दिशा ठरवणार

अवकाळी पावसाने होळीचा बाजार उडाला...

नंदुरबार जिल्हा आदिवासीबहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. होळीनिमित्त आदिवासी बांधव बाजार करण्यासाठी नवापूर विसरवाडी,खांडबारा,चिंचपाडा गावात मोठी गर्दी करतात. मात्र अचानक आलेला अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यासह तुरळक पावसाने होळी बाजाराचा उडवल्याचे चित्र नवापूर शहरात दिसले. या पावसाने व्यापारांची व ग्राहकांची चांगली धावपळ झाली, ज्यामुळे साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यांसह मेघगर्जना झाल्याने ग्राहक अर्धवट बाजार करून घरी निघून गेले.

मावळातही मेघगर्जनेसह पाऊस...

मावळ तालुक्यातील अंदर मावळमध्ये विजेच्या कडकडासह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. अवेळी झालेल्या पावसामुळे आंब्याचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. अचानक आलेल्या या पावसामुळे रब्बी हंगामातील अनेक पिकांचेही नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेले पिक या पावसाने हिरावून नेल्याने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मोबदला द्यावा असं आवाहन शेतकरी करीत आहेत. (Latest Marathi News Update)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com