Maharashtra Rain Update: आजपासून चार दिवस मुसळधार पाऊस; हवामान विभागाने जारी केला अलर्ट

गेल्या तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती.
Maharashtra Rain Update
Maharashtra Rain UpdateSaam Tv

मुंबई: जून महिन्यातील लांबलेल्या पावसाने अखेर जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने (Rain) जोरदार सुरुवात केली. मुसळधार पावसामुळे राज्यात काही पूरस्थिती निर्माण झाली होती, मागिल तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. आता पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उद्यापासून मुंबईसह कोकण, नाशिक, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा राज्यात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. मागील काही दिवपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली होती. (Maharashtra Rain Update)

Maharashtra Rain Update
बंडखोरांची राजकीय तिरडी उठवणारच; संजय राऊतांचा हल्लाबोल

रविवारी आणि सोमवारी मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे (Rain) प्रमाण कमी झाले आहे. आता पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभाने वर्तवला आहे.

तर पुढच्या २४ तासात पालघर, नाशिक, पुणे, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा आहे.(Maharashtra Rain Update)

Maharashtra Rain Update
देशात कोरोनाचा पुन्हा उद्रेक! गेल्या २४ तासांत आढळली मोठी रुग्णसंख्या; ६७ मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. विदर्भात काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. गडचिरोलीत पावसाने जास्त नुकसान झाले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com