यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागाला पावसानं झोडपलं, महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा अंदाज

सकाळी ६ वाजल्यापासून महागाव शहर आणि फुलसावंगी येथे मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली
Yawatmal Rain News
Yawatmal Rain News Saam tv

संजय राठोड

यवतमाळ: यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पारा घसरला असताना आज सकाळी ६ वाजल्यापासून महागाव शहर आणि फुलसावंगी येथे मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान पाऊस सुरू होण्याआधी जोरदार मेघगर्जनेसह पावसाला (Rains) सुरूवात झाली. वादळी वाऱ्यासह उमरखेड शहरात (city) जोरदार पाऊस सुरू झाला आहे.

हे देखील पाहा-

यवतमाळ जिल्ह्यात अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची (farmers) मोठ्या प्रमाणात तारंबळ उडाली आहे. या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पावसामुळे शहरात रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच शेतात देखील पाणी साचल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या पावसामुळे उष्णतेचा त्रास कमी झाला आहे. नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

Yawatmal Rain News
शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्समध्ये 1100 अंकानी कोसळला

दरम्यान, हवामान खात्याने ४ ते ५ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्र (Maharashtra) आणि मराठवाड्यात (Marathwada) मेघगर्जनेबरोबरच पावसाची शक्यता वर्तवली आहे. विदर्भात (Vidarbha) काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने (weather department) वर्तवला आहे. सध्या वाढलेल्या उकाड्यामुळे अंगाची लाहीलाही झाली आहे. यामुळे सर्वसामान्यही पावसाची आतुरतेने वाट बघत आहेत. अशातच अंदमानात मान्सूनचे आगमन झाले आहे. तब्बल ६ दिवस अगोदर मान्सून अंदमानमध्ये पोहोचला आहे. यामुळे महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे. अंदमानात लवकर हजेरी लावल्याने आता राज्यात सर्वत्र वरुणराजाचे लवकरच आगमन होणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com