अभिनंदन! दहावीचा निकाल लागला; ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

दहावीचा निकाल आज जाहीर झाला आहे.
SSC Result 2022
SSC Result 2022Saam TV

पुणे: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (SSC Board) इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज नुकताच जाहीर करण्यात आला आहे. राज्यातीलएकूण ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा कोकण विभागाची बाजी तर नाशिक विभाग सर्वात शेवटी असल्याचं समोर आलं आहे. कोकण विभागाचा निकाल ९९.२७% तर नाशिक विभागाचा निकाल ९५.९०% इतका लागला आहे. (SSC Result 2022 Maharashtra Board Latest Updates)

SSC Result 2022
शाळा सुरू होऊन दोन दिवसानंतरही आश्रम शाळांमध्ये शुकशुकाट

यंदा कोरोना महामारी काळानंतर पहिल्यांदाच झालेली ही दहावीची परीक्षा आहे. मागील वर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या निकालाबाबत एक वेगळी उत्सुकता होती. दरम्यान, आज हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालात नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९७.९६ टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल ९६.०६ टक्के लागला आहे. राज्यात इयत्ता बारावीनंतर दहावीतही कोकणचा निकाल सर्वाधिक निकाल लागला आहे.

आनंदाची बाब म्हणजे यंदा राज्यातील १२ हजार २१० शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. याशिवाय ६६ विषयांपैकी २४ विषयांचा निकाल हा १०० टक्के लागला. दुपारी १ वाजेपासून हा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच ऑनलाईनच रिझल्ट डाऊनलोड करून घेता येणार आहे.

SSC Result 2022
मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकीचं पत्र; पुण्यात खळबळ

कोरोना संकट काळानंतर दोन वर्षानंतर दहावी परीक्षा ऑफलाईन घेण्यात आली होती. त्यातच परीक्षेला १५ दिवस उशीर झाला होता. कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला वेळ मिळाला नाही. त्यामुळे ७५ टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात आली. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या परीक्षेत कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. त्यानुसार दहावीचा निकाल लागला असून मुलींनीच आपणच अजिंक्य असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.

दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. यामध्ये सुमारे १,४४९,६६० विद्यार्थी सहभागी झाले होते. दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १६ लाख ३९ हजार १७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी तर ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

विभागनिहाय टक्केवारी

पुणे - ९६.९६

नागपूर - ९७

औरंगाबाद - ९६.३३

मुंबई - ९६.९४

कोल्हापूर - ९८.५०

अमरावती - ९६.८१

नाशिक - ९५.९०

लातूर - ९७.२७

कोकण - ९९.२७

एकूण - ९६.९४

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com