
डोंबिवली : आज राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (SSC Board) इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी पास झाले आहेत. त्या मुलांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, डोंबिवलीमधील चक्क एका महिलेने वयाच्या ४७ व्या वर्षी परीक्षा दिली. त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. मनीषा राणे असे या महिलेचे नाव असून डोंबिवली (Dombivli) त्या सामाजिक काम करतात. तसेच त्या सध्या भाजप (BJP) कल्याण ग्रामीणच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून सुद्धा काम करत आहेत. दहावीत पास झाल्याने त्यांच्या मेहनत आणि चिकाटीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ( Maharashtra SSC result 2022 Latest News updates In Marathi )
यंदाच्या दहावीच्या परीक्षेत पास झाल्यानंतर मनीषा राणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राणे यांनी सांगितले की, '१९९३ साली ८ वी इयत्तेची परीक्षा दिली.त्यानंतर मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांचे शिक्षण थांबले.९५ साली लग्न झाल्यानंतर त्या मुंबईला आलो.सासरची परिस्थिती देखील जेमतेम असल्याने त्या जेवण बनविणे, धुणी भांडी अशी कामे केली. गणेश नगरमधील महिलांच्या साथीने त्यांनी फंडचा व्यवसाय सुरू केला आणि त्यांची परिस्थिती हळूहळू सुधारू लागली. यादरम्यान एका व्यक्तीने मनीषा यांना तुम्ही काय शिकणार ? असे बोलल्याने त्यांना त्यांचे बोल लागले. त्यानंतर त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला. जुनी ८ वी पास असल्याने मला पदवीची परीक्षा देता आली आहे'.
'पुढे २०२१ मध्ये मी 'सोशल सायन्स' या विषयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. माझी १० वी व १२ वी बोर्डाची परीक्षा राहिल्याने मी या परीक्षा देण्याचे ठरविले. कामातून जसा वेळ मिळेल तसा अभ्यास करत होते. भूमिती, बीजगणित या विषयाचे पेपर कठीण गेले होते, त्यामुळे थोडी धाकधूक होती की विषय सुटतो की नाही. परंतु मी चांगल्या मार्काने पास झाले असून त्याचा मला अभिमान आहे. मला माझे शिक्षण पूर्ण करायचे आहे आणि ते मी करणारच. १२ वी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कायद्याचे शिक्षण (Education) घ्यायचे आहे, असे मनीषा राणे यांनी सांगितले.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.