संस्काराच्या शिदोरीतील उत्तम 'गुण'दर्शन; दहावीच्या परीक्षेत ओमने मारली बाजी

काही विद्यार्थ्यांनी गरीबीवर मात करून परीक्षेत यश संपादन केलं आहे. अशीच जिद्दीची ओम संजीत वाईगणकर याची कहाणी.
SSC Result News Updates
SSC Result News UpdatesSaam Tv

डोंबिवली : आज राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (SSC Board) इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या दहावीच्या परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. काही विद्यार्थ्यांनी गरीबीवर मात करून परीक्षेत यश संपादन केलं आहे. अशीच ओम संजीत वाईगणकर याची जिद्दीची कहाणी. कोरोनाच्या दोन्ही लाटेत न घाबरता रुग्णांच्या घरी जाऊन डब्बा देणारा डोंबिवलीतल्या (Dombivli) ओम संजीत वाईगणकर हा दहावी उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

SSC Result News Updates
Maharashtra SSC result 2022 : पुण्याच्या पठ्ठ्याची कमाल;सर्वच विषयात ३५ गुण

ओम संजीत वाईगणकर हा डोंबिवली मधील रहिवासी असून घरची परिस्थिती ही बेताची आहे. त्याचे आई-बाबा अंडा-बुर्जीची गाडी चालवतात आणि आपल्या संसाराचा गाडा ओढतात. त्यामुळे ओम सुद्धा आपले शिक्षण घेत आई-बाबा गाडी चालवायला मदत करतो. जेव्हा वेळ असेल गाडी उभे राहून काम करणे, उरलेल्या वेळात अभ्यास करणे असा त्याचा दिनक्रम असतो.

SSC Result News Updates
जिद्दीला सलाम! भाजपच्या कल्याण ग्रामीण अध्यक्षा झाल्या दहावी उत्तीर्ण

तसेच कोरोना काळात गाडी बंद असल्याने घरपोच डब्बा पोचवणे हे ओम काम चालू केले. कुठेही न डगमगता , न घाबरता हे तो काम करत होता आणि घर चालवण्यासाठी काम करत होता.त्यामुळे डोंबिवली अनेक जण त्याला ओळखू लागले. याच ओमने दहावीच्या परीक्षेत ७० टक्के गुण प्राप्त केले आहे. त्यामुळे तो खुश झाला आहे. पुढे जाऊन तो कँटरिंग व्यवसाय करणार असून त्यासाठी तो शिक्षण घेणार आहे. त्याच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भाजपच्या कल्याण ग्रामीण अध्यक्षा झाल्या दहावी पास

डोंबिवलीमधील चक्क एका महिलेने वयाच्या ४७ व्या वर्षी परीक्षा दिली. त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. मनीषा राणे असे या महिलेचे नाव असून डोंबिवली (Dombivli) त्या सामाजिक काम करतात. तसेच त्या सध्या भाजप (BJP) कल्याण ग्रामीणच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा म्हणून सुद्धा काम करत आहेत.दहावीत पास झाल्याने त्यांच्या मेहनत आणि चिकाटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com