चालकाच्या प्रसंगावधानामुळे काेल्हापूरात प्रवाशांचा वाचला जीव
fire

चालकाच्या प्रसंगावधानामुळे काेल्हापूरात प्रवाशांचा वाचला जीव

कोल्हापूर : साेलापूरहून कोल्हापूरच्या वेशीपर्यंत पाेहचलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला पहाटेच्या सुमारास आग fire लागली. या आगीत संपुर्ण बस जळून खाक झाली आहे. या घटनेत काेणतीही जिवित हानी झाली नसल्याचे एसटी महामंडळाकडून तसेच पाेलिसांनी सांगितले. maharashtra-state-transport-bus-caught-fire-solapur-kolhapur-breaking-news

बस क्रमांक एम.एच. ०६ एस ८४१३ ही राज्य परिवहन महामंडळाची बस आज पहाटेच्या सुमारास साेलापूरहून काेल्हापूर नजीकच्या हाॅटेल तावडे येथे पाेहचली. या बसच्या चालकास आपल्या बाजूच्या मागील चाकाच्यानजीक धूर येताना दिसला. त्याने तातडीने बस थांबवली. बसमधून उतरताच त्याच्या लक्षात आले शॉर्टसर्किटमुळे पेट घेतला आहे.

fire
साता-यात 'या' मार्गावर वन वे; पार्किंग व्यवस्थेतही बदल

तात्काळ चालक किरण पाटील यांनी प्रवाशांना खाली उतरण्याची सूचना केली. आग लागल्याची माहिती नागरिकांनी अग्नीशमन विभागास दिली. परंतु आगीने राैद्ररुप धारण करीत संपुर्ण बसला वेढा घेतला. त्यामुळे संपुर्ण बस जळून खाक झाली. या घटनेची नाेंद गांधीनगर पाेलिस ठाण्यात झाली आहे. दरम्यान चालक किरण पाटील यांच्या प्रसंगावधाने आज बसमधील प्रवाशांचा जीव वाचल्याची चर्चा परिसरात हाेती.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com