एसटी कर्मचाऱ्यांचे आरोग्या धोक्यात! ; रेस्ट हाऊस मध्ये घाणच घाण

राज्यभरात प्रवाशी वाहतूक करणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे जाळे संपूर्ण गावागावात पसरलेले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे आरोग्या धोक्यात! ; रेस्ट हाऊस मध्ये घाणच घाण
एसटी कर्मचाऱ्यांचे आरोग्या धोक्यात!; रेस्ट हाऊस मध्ये घाणच घाण जयेश गावंडे

अकोला: राज्यातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवून देणारे एसटी महामंडळाचे चालकवाहकच सुरक्षित आणि निरोगी आराम करू शकत नसल्याची परिस्थिती आहे. अकोला मध्यवर्ती बसस्थानकात असलेल्या चालकवाहकांच्या विश्रामगृहात कुठलीच व्यवस्था नसल्याची परिस्थिती आहे. याबाबतीत वरिष्ठांकडे तक्रार करून ही कुठलाच फरक पडला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासोबतच कोरोना संसर्ग प्रतिबंध नियमांचे येथे मात्र सर्रास उल्लंघन होत आहे.

राज्यभरात प्रवाशी वाहतूक करणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे जाळे संपूर्ण गावागावात पसरलेले आहे. जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी मुक्कामासाठी गेलेल्या एसटी चालकवाहकाना विश्रामगृहांची व्यवस्था आहे. मात्र ती योग्य प्रकारे नसल्याने त्यांच्यामध्ये नाराजी आहे. ही परिस्थिती कोणा एका ठिकाणची नाही तर सर्वच ठिकाणची आहे. रात्रभर प्रवास करणारे किंवा दिवसभर वाहन चालवून थकणाऱ्या चालक, वाचकांसाठी योग्यप्रकारे विश्रामाची व्यवस्था नाही. परिणामी, आहे त्याच ठिकाणी हे चालकवाहक परिस्थितीशी जुळवून घेतात.

एसटी कर्मचाऱ्यांचे आरोग्या धोक्यात!; रेस्ट हाऊस मध्ये घाणच घाण
अतितिव्र कुपोषित बालकांच्या उपचारासाठी विशेष उपाययोजना : मंत्री ॲड. के. सी. पाडवी

याबाबत वरीष्ठ किंवा आगार व्यवस्थापक यांच्याकडे तक्रार केल्यावरही आश्वासना व्यतिरिक्त दुसरे काहीच मिळत नाही. कुठल्याही तक्रारीकडे लक्ष दिल्या जात नाही. त्यामुळे येथे स्वच्छता नावापुरती होते. त्यामुळे विश्रामगृहांची परिस्थिती जैसे थेच आहे.

चालकवाहक हे दुसऱ्या जिल्ह्यातून आले की त्यांना आरामसाठी त्यांच्यासाठी बांधण्यात आलेल्या विश्रामगृहात आराम करण्यास मिळतो. परंतु, या ठिकाणी चालकवाहक यांना झोपण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. पलंग नाही, गादि नाही. खाली फक्त एक मोठी सतरंजी टाकून दिलेली आहे. ती पण मळून गेलेली आहे. तरीही हे चालकवाहक तिथे कसाबसा आराम करतात.

विश्रामगृहात स्वच्छता गृह आहेत. परंतु, तेही घाण आहेत. तिथे पण दररोज साफसफाई होत नाही. अनेकवेळा तर हे स्वच्छतागृह भरलेले असतात. सांडपाण्याची व्यवस्था नाही. परिणामी याठिकाणी दुर्गंधी नेहमीच असते. नाकावर हात ठेवून किंवा तोंडावर रुमाल बांधून हे चालकवाहक येथे काहीकाळ राहतात.

वाचकांकडे तिकिटाचे पैसे असतात. हे विश्रामगृहात आल्यावर तिकीट आणि पैसे कुठे सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असा प्रश्न वाहकांना पडलेला आहे. बऱ्याचवेळा या ठिकाणी वाहकांच्या बॅगमधून पैसे काढण्याचे प्रकार घडलेले आहेत. तयामुळे असुरक्षित आणि निरोगी ठिकाणी हे चालकवाहक आराम करतात, हे विशेष.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com