एसटी कर्मचारी दशरथ गिड्डेंची गळफास लावून आत्महत्या
dashrath gidde

एसटी कर्मचारी दशरथ गिड्डेंची गळफास लावून आत्महत्या

पंढरपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपूर आगारातील कर्मचारी दशरथ गिड्डे याने आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास घरात गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

dashrath gidde
कबड्डीपटूची हत्या; सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण : उदयनराजे

गेल्या अनेक वर्षापासून दशरथ गिड्डे हे पंढरपूर येथील एसटी महामंडळाच्या यांत्रिकी विभागात कार्यरत हाेते. आज (बुधवार) पहाटे त्यांनी घरात आत्महत्या केल्याने कुटुंबातील सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या मागे पत्नी व दोन लहान मुले आहेत. श्री. गिड्डे यांचे मूळ गावा मोहोळ हे आहे. गिड्डे गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होते असे सांगितले जात आहे. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचारी तणावात आहेत. त्यातूनच बहुतांश ठिकाणी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. आज पंढरपुरातील यांत्रिक विभागात काम करणा-या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने एसटी महामंडळात खळबळ उडाली आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.