Pune Weather Update : हवामान खात्याचा अंदाज अगदी खरा ठरला; पुणे, नागपुरात अवकाळी पावसाची जोरदार एन्ट्री

Rain In Pune And Nagpur : हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज अचूक ठरला. पुण्यात आणि नागपुरात अनेक ठिकाणी आज संध्याकाळच्या सुमारास पावसानं हजेरी लावली.
Rain In Pune Latest Update
Rain In Pune Latest UpdateSAAM TV

अक्षय बडवे, संजय डाफ

Maharashtra Weather News Update : राज्यात पुढील दोन दिवस वातावरण ढगाळ राहणार असून, मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता. हवामान खात्यानं वर्तवलेला अंदाज अचूक ठरला. पुण्यात आणि नागपुरात अनेक ठिकाणी आज संध्याकाळच्या सुमारास पावसानं हजेरी लावली. असह्य उकाड्यातही पावसानं लावलेली हजेरी दिलासादायक ठरत असली तरी, असं अवकाळी बरसण्याने सर्वसामान्य नागरिक चिंतितही झाले आहेत. (Latest Marathi News)

पुण्यात (Pune) संध्याकाळच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. आज संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह शहरात पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला होता. त्यानंतर काही तासांतच शहरातील मध्यवर्ती भागात पाऊस कोसळू लागला. (Rain Update)

पुण्यातील औंध भागात गारांचा पाऊस

पुण्यातील औंध भागात गारांचा पाऊस कोसळला. पुण्यातील मध्यवर्ती तसेच उपनगरांत पावसाने हजेरी लावली. दुपारी ढगाळ वातावरणानंतर ५ वाजण्याच्या सुमारास शहरात पावसाला सुरुवात झाली. पुढील २ दिवस पुण्यात सायंकाळी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Rain In Pune Latest Update
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशन रोज 5 तास राहणार बंद, प्रवाशांचे होणार हाल; वाचा नेमकं कारण

नागपुरात अवकाळी पावसाची हजेरी

नागपूरच्या अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारपर्यंत कडक ऊन पडल्यानंतर संध्याकाळी अचानक पावसाने एन्ट्री घेतली आणि नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळं हवेत गारवा निर्माण झाला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

Rain In Pune Latest Update
Nagpur News: भाविकांसाठी महत्वाचं! तोकडे कपडे घालून देवदर्शनाला आला तर... मंदिर महासंघाचा मोठा निर्णय

पुणे वेधशाळेचा अंदाज काय?

राज्यात पुढील २ दिवस वातावरण ढगाळ राहणार, असून मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे.

पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवस पुण्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील. नैऋत्य मोसमी पाऊस अजूनही पुढे सरकलेला नाही. अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यात पुढील २ दिवस वातावरण ढगाळ राहणार असून, मेघगर्जनेसह काही ठिकाणी पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com