Maharashtra Weather Update: मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता; मराठवाड्यात पुढचे ५ दिवस सौम्य थंडी

Maharashtra Weather Update: शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
Maharashtra weather update
Maharashtra weather update saam tv

Maharashtra Weather Update: गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यात थंडीची लाट कमी झाली आहे. तापमानात ५ अंशाने वाढ झाल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. अशात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस येऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Latest Maharashtra Weather News)

काल अवकाळी पावसाने नंदुरबार जिल्ह्यात हजेरी लावली. नागपुर तालुक्यातील काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. तसेच खांडबारा आठवडे बाजारात यामुळे काल नागरिकांची मोठी धांदळ उडाली होती. मराठवाडा आणि विदर्भात थंडी जास्त प्रमाणात होती. याचा परिणाम येथील शेतीवर झाला. अशात आता पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता असल्याने शेतीवर याचा परिणाम होणार आहे. शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

रब्बी पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान होऊ शकते. बऱ्याच ठिकाणी कांद्याची लागवड करण्यात आली आहे. मात्र कडाक्याच्या थंडीने कांद्यावर करपा रोग पसरल्याचं दिसत आहे. अवकाळी पाऊस झाल्यास गहू, हरभरा आणि मका अशा पिकांना याचा जास्त धोका आहे. पावसाने या पिकांची नासाडी होऊ शकते. यामुळे बळीराजा चिंतेत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, थंडीची लाट २ फ्रेब्रुवारीपर्यंत जाणवेल. तसेच पुढचे ४ ते ५ दिवस अवकाळी पाऊसही होऊ शकतो.

Maharashtra weather update
Weather Update : सावधान! कडाक्याच्या थंडीत होणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला अलर्ट

मुंबईतील किमान तापमानात देखील बदल जाणवत आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून मुंबईतील तापमानात वाढ झाली आहे. तसेच ढगाळ वातावरण जाणवत आहे. यामुळे मुंबईमध्ये देखील तुरळक प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com