Maharashtra Weather: राज्यात हुडहुडी! नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका

राज्यात थंडीचा कडाका अधिक वाढणार
Maharashtra Weather
Maharashtra WeatherSaam Tv

Nashik News : थंडीने गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा आपला कडाका सुरु केला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील तापमानाचा पारा बराच खाली आला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा सर्वच ठिकाणी थंडीचा कडाका सुरु झाला आहे. तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यभरात गारठा कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे.

काडकाच्या थंडीमुळे (Winter Season) ग्रामीण भागासह शहरातही शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्‍वरसारखी थंड वातावरणाची अनुभूती येत आहे.

Maharashtra Weather
Weather Alert : देशातील 'या' भागात आज मुसळधार पावसाची शक्यता; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला

नाशिकमध्ये थंडीचा कडाका

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडका कायम आहे. निफाडमध्ये यंदाच्या हंगामातील सर्वात नीच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. निफाडचा पारा ७ अंशांपर्यंत खाली घसरला आहे तर नाशिकमध्येही तापमान १० अंशांखाली गेले आहे. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचं हे निचांकी तापमान आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्र गारठला आहे.

पुण्यात 23 नाव्हेंबरपासून थंडीची तीव्रता कमी होईल

पुणेकरांनी थंडीचा कडाका अनुभवायला सुरवात केलीय. त्यामुळे थंडीचा आनंद घेताना पुणेकर पाहायला मिळाले. गेल्या तीन दिवसांपासून शहराचा किमान तापमानाचा पारा ११ अंशांवर होता. शनिवारी तो १०.३ अंशांवर खाली आला. तर रविवारी तो ९.३ अंशांवर खाली आला. पुणे शहर गारठल्याने नागरिकांनी उबदार कपडे,कानटोपी,स्वीटर घालून बाहेर पडत आहेत. थंडीचा कडाका अजून दोन दिवस राहील, मात्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा रविवारी तयार झाल्याने राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहे. त्यामुळे दोन दिवसांत ढगाळ वातावरण निर्माण होऊन 23 नाव्हेंबरपासून थंडीची तीव्रता कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.मात्र थंडी असली तरी पुणेकर याचा आनंद घेताना दिसतायात.

परभणीत पुन्हा थंडी

परभणी शहरासह जिल्हा भरात कडाक्याची थंडी वाढली आहे. काल रविवार 8.3 इतक्या तापमानाची नोंद झाली होती,तर आज पुन्हा तापमानात घट झाल्याने थंडीचा तडाका वाढलाय. तापमानात घट होत असल्याने गरम कपड्याच्या खरेदीसाठी नागरिक गर्दी करत आहेत.

बदलापूर बनलं नव थंड हवेचं ठिकाण!

बदलापूर शहर हे नवं थंड हवेचं ठिकाण बनलं आहे. कारण यंदाच्या हिवाळ्यात पहिल्यांदाच ११.२ अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद बदलापूर शहरात झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून बदलापूर शहरात गारठा चांगलाच वाढला असून तापमानाचा पारा हा १२-१३ अंशांच्या घरात होता. मात्र रविवारी बदलापूर शहरात ११.२ अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com