
Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात सातत्याने बदल होत आहे. कधी पावसाच्या सरी, तर उन्हाचा कडाका जाणवत आहे. उकाड्यामुळे लोक हैराण झाले असून यापासून कधी सुटका होईल, याची वाट पाहत आहे. अशातच हवामान खात्याने पुढील तीन दिवसात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे. (Latest Marathi News)
त्याचबरोबर शुक्रवारी दुपारनंतर काही ठिकाणी विजांसह पाऊस कोसळण्याचा अंदाजही हवामान विभागाने (Weather Updates) व्यक्त केला आहे. मोसमी पाऊस सक्रिय होईपर्यंत पुढील तीन दिवस विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.
अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यात बाष्पाचे प्रमाण वाढले आहे. तसेच स्थानिक तापमान वाढीचा परिणाम म्हणून दुपारनंतर ढग जमा होऊन विजांच्या कडकडाटासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचीही शक्यता आहे. उष्णतेत वाढ झाल्याचा परिणाम म्हणून काही ठिकाणी वादळासह पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. (Breaking Marathi News)
हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सातारा, सांगली, सोलापूर, अकोला, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांतील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटांची (Heat Wave) शक्यता आहे. तुरळक ठिकाणी दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याचाही अंदाज आहे.
हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार (Weather Updates) येत्या १ जून रोजी मान्सून (Monsoon Update) केरळ आणि तामिळनाडूमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर ५ जूनपर्यंत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्येत मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहचू शकतो.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.