Pre Monsoon Rain: राज्याला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा, अनेक भागात झाडांची पडझड; बुलढाण्यात मोबाईल टॉवर कोसळला

Pre Monsoon Rain In Maharashtra: मान्सूनपूर्व पावसाचा राज्यात ठिकठिकाणी धुमाकूळ सुरू आहे. रविवारी पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार झाला.
Pre Monsoon Rain In Maharashtra
Pre Monsoon Rain In MaharashtraSaam TV

Pre Monsoon Rain In Maharashtra: यंदा राज्यात मान्सून उशीराने दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. चक्रीवादळामुळे मान्सूनला उशीर होऊ शकतो, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. पण तत्पूर्वी मान्सूनपूर्व पावसाचा राज्यात ठिकठिकाणी धुमाकूळ सुरू आहे. रविवारी पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार झाला. (Latest Marathi News)

पावसासह वादळी वाऱ्याचा जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. याशिवाय घरांवरील पत्रेही उडून गेल्याचं समोर आलं आहे. नाशिकमधील मालेगावमध्ये वीज पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तसेच बुलढाण्यात वादळी वाऱ्यामुळे मोबाइल टॉवर कोसळल्याची घटना घडली आहे.

Pre Monsoon Rain In Maharashtra
Monsoon Update: अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा मान्सूनला फटका; पावसाचे आगमन पुन्हा लांबणीवर!

नाशिकमध्ये पावसाच्या जोरदार सरी

नाशिकमध्ये आठवडाभरापासून उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. या वातावरणात रविवारी बदल झाले. सकाळपासून अनेक भागांत ढगाळ वातावरण झाले. नाशिक शहरासह जिल्ह्यात दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली.

अचानक आलेल्या पावसाने (Rain Update) नागरिकांची तारांबळ उडाली. द्वारका, वडाळा भागात झाड कोसळले. यात जीवितहानी झाली नसली तरी दुचाकीचे नुकसान झाल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. गोदाकाठी उभारलेला मंडपही कोसळला.

बुलढाण्यातील मलकापूरमध्ये मोबाईल टॉवर कोसळले

बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगाव, नांदुरा, मलकापूर या तालुक्यात वादळी वाऱ्यासह धो धो पाऊस बरसला. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी घराची छपरे उडून गेली आहेत. तर झाडे देखील उन्मळून पडली आहेत. मलकापूर तालुक्यातील माकनेर गावात चक्क उंच असे मोबाईल टावर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.

Pre Monsoon Rain In Maharashtra
Bihar Crime News: संतापजनक! लग्नासाठी माहेरी आलेल्या विवाहितेवर घरात घुसून बलात्कार, २४ वर्षीय तरुणाला अटक

सुदैवाने घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. वादळी वारे आल्याने शेतात काम करत असणारे माकनेर येथील शेतकरी कुटुंब घरी निघून गेले. त्यानंतर वादळी वाऱ्याच्या प्रचंड झोताने अक्षरश: हे टॉवर जमीनदोस झाले आहे. सुदैवाने या टॉवरखाली कुणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

अमरावतीला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा

अमरावतीच्या (Amravati) नांदगाव पेठ भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचे हजेरी लावली असून बिजी लँड कापड बाजारपेठतील दुकानांना याचा फटका बसला आहे. तसेच वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे देखील कोसळली. छत्रपती संभाजीनगरमध्येही मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावरचे पत्र्याचे दुकान उडून गेल्याची घडना समोर येत आहेत.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com