अहमदनगर : प्रवरा रुग्णालयात राज्यातील सर्वात मोठ्या ICU सेंटरची उभारणी

अहमदनगर : प्रवरा रुग्णालयात राज्यातील सर्वात मोठ्या ICU सेंटरची उभारणी
Pravara hospitalsaam tv

शिर्डी : अहमदनगरच्या लोणी येथे प्रवरा रुग्णालयात (Pravara hospital) राज्यातील सर्वात मोठे आयसीयू सेंटर (big icu center) उभारले जाणार आहे. गुगल इंडिया (google India) तसेच इस्कॉनच्या (iskon) मदतीने 100 कोटी रुपये खर्च (hundred crore expenses) करून आयसीयू सेंटर उभं रहाणार आहे. ग्रामीण भागात आधुनिक व्हेंटीलेटरसह 100 बेड्स तसेच 315 आयसीयू बेड्सची उपलब्धता असणार आहे.

Pravara hospital
नक्षलग्रस्त भागातील दोन हजार युवकांना रोजगार; पालकमंत्र्यांच्याहस्ते नियुक्तीपत्रे प्रदान

राज्यातील सर्वात मोठं आयसीयू सेंटर लोणीमध्ये उभारलं जाणार असून प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या कित्येक दशकापासून ग्रामीण भागातील लोकांना अल्प दरामध्ये सेवा देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील रुग्णांना शहरात जाण्याची गरज भासणार नाहीये. शिक्षण संशोधन रोजगार आणि उपचार अशा सर्व भूमिका पार पाडणाऱ्या प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून आयसीयु सेंटरच्या भूमिपूजन कोनशिलेचे अनावरण व व्हेंटिलेटचा लोकार्पण सोहळा बुधवारी पार पडला.

इस्कॉन गोवर्धन इकोव्हिलेजचे डायरेक्टर गौरंगदास प्रभू यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र विखे पाटील व प्रवरा मेडिकल ट्रस्टचा स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Edited By- Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com