महाराष्ट्र कायद्याचे राज्य हुकूमशाही चालणार नाही; अजित पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार

कायद्याच्या विरोधात कोणी काही केलतर पोलीस कारवाई करणार, असंही पवार म्हणाले.
महाराष्ट्र कायद्याचे राज्य हुकूमशाही चालणार नाही; अजित पवारांचा राज ठाकरेंवर पलटवार
Ajit PawarSaam Tv

नाशिक : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल औरंगाबामध्ये सभा घेतली. या सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन पुन्हा त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला. यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रीया दिली. शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय प्रसिध्दी मिळत नाही. त्यामुळे ते नाव घेतात. महाराष्ट्र कायद्याचं राज्य आहे, कुणाचीही हुकुमशाही चालणार नाही, असा इशाराही अजित पवार यांनी दिला.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मागचे भाषण पुन्हा रिपीट केलं. शरद पवारांनी कधीही जातीच राजकारण केलं नाही. कारण नसताना शरद पवारांचे नाव घ्यायचे, त्यांचे नाव घेतले म्हणजे प्रसिद्धी मिळतेचं. कायद्याचे पालन सर्वांनी केलं पाहिजे. उत्तर प्रदेशातील भोंग्यावर बोलताना पवार म्हणाले, उत्तर प्रदेशात फक्त मशिदींवरील भोंगे उतरवले नाही, तर माझ्या माहितीप्रमाणे मंदिरांवरीलही लाऊस्पिकर बंद केले आहेत.

Ajit Pawar
...म्हणून राज ठाकरे पवारसाहेबांवर टीका करतात; सुरेखा पुणेकरांची बोचरी टीका

राज ठाकरेंच्या सभेत अटी शर्तीचे पालन केले नसेल तर, पोलिसांनी पुढील कारवाई करावी, असंही पवार (Ajit Pawar) म्हणाले. लोकसभेच्यावेळी ते भाजप विरोधात बोलत होते, त्यानंतर आता त्यांचं मतपरिवर्तन, मनपरिवर्तन झालं आहे. त्याच्यातून त्यांनी राष्ट्रवादी, सेना विरोधात बोलायला सुरुवात केली असल्याचा टोला अजित पवार यांनी लगावला.

राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावर बोलताना पवार म्हणाले, घरात बसून यांना बोलायला काय जात, केसेस कार्यकर्त्यांवर होतील. कायद्याच्या विरोधात कोणी काही केलतर पोलीस (Police) कारवाई करणार. कुणाच्या भाषणातून जातीय द्वेष पसरवला जात असेल, तर हे महाराष्ट्राला परवडणारे नाही.

Ajit Pawar
Mahesh Tapase : भाजपच्या स्क्रिप्ट शिवाय राज ठाकरे बोलत नाही - महेश तपासे

राज्यात अनेक प्रश्न

राज्यात उष्णतेची लाट, भारनियमन, महागाई इतर अनेक प्रश्न महत्त्वाचे आहेत. पण त्यावर बोलायचे नाही. कुणी अल्टिमेटम देत असेल आणि त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल, तर पोलीस यंत्रणा त्यांचे काम करेल, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com