महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला औरंगाबाद शहरात सकाळपासून सुरुवात

या बंदला शहरातील नागरिक आणि व्यवसायिक कसा प्रतिसाद देतात, शिवाय बंदचे परिणाम सकाळी दहा वाजल्यानंतर स्पष्ट दिसेल.
महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला औरंगाबाद शहरात सकाळपासून सुरुवात
महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला औरंगाबाद शहरात सकाळपासून सुरुवातडॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला औरंगाबाद शहरात सकाळपासून सुरुवात झाली आहे. सकाळी जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक खरेदी-विक्री सुरू असल्याने रस्त्यावर तुरळक गर्दी दिसून येते आहे. या बंदला शहरातील नागरिक आणि व्यवसायिक कसा प्रतिसाद देतात, शिवाय बंदचे परिणाम सकाळी दहा वाजल्यानंतर स्पष्ट दिसेल. मात्र, औरंगाबाद शहरात या बंदला चांगला प्रतिसाद मिळेल अशी स्थिती आहे.

हे देखील पहा -

सकाळी नऊ वाजल्यापासून उघडणारी काही दुकानात अद्याप उघडली नाहीत. सकाळची नेहमीची वर्दळ कमी झालेली आहे. काल शिवसेना महा विकास आघाडीच्या वतीने शहरातील नागरिकांना व्यापाऱ्यांना बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन केले होते. शिवाय बंद काळात कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही याची खबरदारी घेण्यासंदर्भात शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सांगितले होते. तर दुसरीकडे भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी नवरात्री आणि सण, उत्सवाचा काळ हा व्यवसायासाठी महत्त्वाचा असल्याने व्यापाऱ्यांनी बंद हाणून पाडावा असे आवाहन केले होते. त्यामुळे आज या दोन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.