"महाविकास आघाडी सरकारची परिस्थिती सिंहासन सिनेमासारखी"- आमदार किसन कथोरेंचा टोला
"महाविकास आघाडी सरकारची परिस्थिती सिंहासन सिनेमासारखी"- आमदार किसन कथोरेंचा टोलाराजेश भोस्तेकर

"महाविकास आघाडी सरकारची परिस्थिती सिंहासन सिनेमासारखी"- आमदार किसन कथोरेंचा टोला

जनतेसमोर जाण्यास महाविकास आघाडी सरकारकडे प्रश्नच नाहीत म्हणून अधिवेशन घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप भाजपचे माजी मंत्री आमदार किसन कथोरे यांनी केला आहे.

राजेश भोस्तेकर, रायगड

रायगड: महाविकास आघाडी सरकारची परिस्थिती ही मराठी सिनेमा सिंहासन सारखी झाली आहे. जनतेसमोर जाण्यास महाविकास आघाडी सरकारकडे प्रश्नच नाहीत म्हणून अधिवेशन घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप भाजपचे माजी मंत्री आमदार किसन कथोरे यांनी केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवून त्यांना न्याय द्या अशी मागणीही आमदार कथोरे यांनी केली आहे. ("Mahavikas Aghadi government's situation is like a sinhasan cinema" - MLA Kisan Kathore slams to MVA)

हे देखील पहा -

महाविकास आघाडीचे फसवणुकीचे दोन वर्षे हा मुद्दा घेऊन आज अलिबाग तुषार विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती. माजी मंत्री आमदार किसन कथोरे यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षांत काहीच केले नसून सिंहासन सिनेमातील मुख्यमंत्र्यांसारखी परिस्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची झाली आहे, असा आरोप केला आहे. आमदार रवींद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, दक्षिण जिल्हाध्यक्ष ऍड महेश मोहिते यावेळी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

"महाविकास आघाडी सरकारची परिस्थिती सिंहासन सिनेमासारखी"- आमदार किसन कथोरेंचा टोला
Viral Video: वाढदिवसाचा अतिरेक, NCP नेत्याची जेसीबीच्या खोऱ्यावर चढून चमकोगिरी

कोरोनाची पार्श्वभूमी घेऊन या सरकारने दोन वर्षे काढली. मात्र राज्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. साधे अधिवेशन घेण्यासही यांना रस नाही. सारख्या तारखा बदलत आहेत. जनतेसमोर जाण्यास याच्याकडे कोणतेच प्रश्न नसल्याने ते अधिवेशन घेण्यास टाळाटाळ करीत आहेत, अशी टीका आमदार कथोरे यांनी केली आहे. एसटी कर्मचारी हे तुटपुंज्या पगारात काम करीत आहेत. त्यांना न्याय सरकारने दिला पाहिजे आम्ही कर्मचाऱ्यांसोबत आहोत असे कथोरे यांनी म्हटले आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com