अकोल्यात वीज चोरांना महावितरणाचा दणका; आकडे टाकून वीज चोरी पडली महागात

Akola Letest News :महावितरणच्या वीज वाहिन्यांवर आकडे टाकून अनेकजण वीज चोरी करत असल्याचं दिसून आलं
Akola Mahavitaran
Akola MahavitaranSaam TV

अकोला : वीजवाहिन्यांवर आकडे टाकून फुकटात वीज वापरणाऱ्यांच्या विरोधात महावितरणने (Mahavitaran) कारवाईचा बडगा उचलला आहे. अकोला (Akola) जिल्ह्यात सुरू असलेल्या या मोहिमेत 21 एप्रिल ते आतापर्यंत या कालावधीत 915 वीज चोरट्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. आकडे टाकून केवळ घरासाठीच वीजपुरवठा घेतला जात नाही, तर शेतीच्या सिंचनासाठीही आकडे टाकून वीजचोरी केली जात असल्याचे या मोहिमेत निदर्शनास आले आहे. (Akola Mahavitanar Letest News)

Akola Mahavitaran
लातुरात पोलीस हवालदारला तीन हजारांची लाच स्वीकारताना अटक

महावितरणच्या वीज वाहिन्यांवर आकडे टाकून अनेकजण वीज चोरी करत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात वीज यंत्रणेवरील दबाव वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून कुठलेही वीज कनेक्शन न घेता फक्त आकडे टाकून अवैधपणे वीज वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली होती. त्यामुळे वारंवार विजेची समस्या निर्माण होत होती. याचा फटका प्रामाणिक वीज ग्राहकांना देखील बसत होता. यासंदर्भात महावितरणकडे बऱ्याच तक्रारी सुद्धा आल्या होत्या.

दरम्यान, आता महावितरणने तक्रारींची दखल घेत अवैधपणे वीज वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. अकोला महामंडळात वीजगळती अधिक असलेल्या फिडरवर मोहीम राबविण्यात येत आहे. थेट विद्युत तारांवर आकडे टाकून वीजपुरवठा घेणारे अनेकजण या कारवाईत पकडण्यात आले. काही ठिकाणी मीटरमध्ये हेराफेरी केल्याचेही प्रकार समोर आले आहेत. सर्वाधिक वीजचोरी ग्रामीण भागात होत असल्याचे या कारवाईदरम्यान समोर आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com