Nashik News : महावितरण कर्मचाऱ्याची फिल्मी स्टाईल कामगिरी; पाण्यातून ७० फूट अंतर कापत वीज पुरवठा केला सुरळीत

कर्मचाऱ्याने तब्बल ७० फूट अंतर २० फूट खोल तलावातून पार केले आणि विद्यूत पुरवठा सुरळीत केला.
Nashik News
Nashik News अभिजीत सोनवणे, नाशिक

Nashik News : नाशिकच्या सिन्नर येथे शुक्रावारी सहा तासांपासून खंडीत झालेला वीज पूरवठा महावितरणाच्या कर्मचाऱ्याच्या धाडसामुळे सुरळीत झाला आहे. कर्मचाऱ्याने तब्बल ७० फूट अंतर २० फूट खोल तलावातून पार केले आणि विद्यूत पुरवठा सुरळीत केला. कर्मचाऱ्याने दाखवलेल्या या धाडसामुळे आता सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सविस्तर माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून वावी व पाथरे या ठिकाणचा विद्यूत (Electricity) पुरवठा खंडीत झाला होता. काही तांत्रिक अडचणींमुळे विद्यूत पुरवठा ६ तास बंद होता. हा बिघाड शोधण्यासाठी दोन्ही उपकेंद्रांचे कक्ष अभियंता अजय सावळे व हर्षल मांडगे हे आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन सिन्नर ते वावी दरम्यान असलेल्या मुख्य वीज वाहिनीवर पेट्रोलिंग करत होते. अशात बराच वेळ शोधल्यानंतर नेमका बिघाड कुठे झाला आहे हे समजले.

यावेळी गोंद नाल्यावर पाझर तलाव क्षेत्रात असलेल्या पोलवर बिघाड झाल्याचे समजले. समृध्दी महामार्गाच्या कामासाठी हा तलाव (Lake) तयार करण्यात आला आहे. अशात तलावाच्या काठापासून विजेच्या खांबाचे अंतर 70 फूट लांब आणि तलावाच्या पाण्याची खोली २० फूट खोल आहे. त्यामुळे हे तलाव पार करून वीजेच्या खांबात झालेला बिघाड दुरुस्त करण्याचे मोठा प्रश्न मिर्माण झाला होता.

Nashik News
Nashik Crime News: नाशिकच्या आधारतीर्थ आश्रमातील चिमुकल्याच्या हत्येचा उलगडा; 'या' कारणासाठी १३ वर्षाच्या मुलाने केली हत्या

यावेळी मूळचा मीठसागरे येथील रहिवासी व वावी,पाथरे उपकेंद्रात कार्यरत असलेला कर्मचारी योगेश बापू वाघ हे दोघे पुढे आले. योगेशने पुढे जाऊन दुरूस्ती करण्यास सहमती दिली. यानंतर शेतकऱ्यांकडून दोन ते तीन दोर आणले. यातील एक योगेशच्या कंबरेला बांधला. दुपारी १२.३० च्या सुमारात तो तलावात उतरला आणि पोहून वीजेच्या खांबापर्यंत पोहचला.

Nashik News
Nashik Crime : अल्पवयीन मुलाकडून ४ वर्षीय चिमुकल्याची हत्या; आधारतीर्थ अनाथ आश्रमातील खूनाचा अखेर उलगडा

तिथे पोहचल्यावर काम करण्यासाठी त्याला एक तासाचा अवधी लागला. त्यानंतर दुपारी दोन वाजेच्या सुमारास वावी व पाथरे येथील उपकेंद्रांचा तब्बल सहा तासांपासून खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला. फिल्मी स्टाईलने केलेल्या कामामुळे सर्वांनी योगेशचे कौतुक केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com