एसटी आगारात तरी मेंटेनन्सचे मीटर सुसाट! खर्च तब्बल 4 कोटी

एसटी आगारात तरी मेंटेनन्सचे मीटर सुसाट! खर्च तब्बल 4 कोटी
ST BUS

भंडारा ः कोरोनामुळे राज्य दोनदा लॉकडाउन करावे लागले. परिणामी एसटी बस सेवाही ठप्प झाली होती. राज्यात सर्वत्र बस आगारातच थप्पीला लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे महामंडळाचे मोठे नुकसान झाले. एसटीचे चाक थांबले असताना मेंटेनन्सचे मीटर मात्र जोरात सुरू आहे. त्यापोटी तब्बल 4 कोटी रूपयांचा फटका महामंडळाला बसला आहे.

दुसऱ्या लॉकडाउनमध्ये भंडारा आगाराची ST बस सेवा बंद होती. एकही बस रस्त्यावर धावली नाही. तरीही सर्व बसेसचा मेन्टेनन्स खर्च तब्बल 4 कोटी रूपये आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. "खाया पिया कुछ नही गिलास तोड़ा 12 आना" या खर्चामुळे ही हिंदी कहावत लोकांच्या तोंडी येत आहे.

ST BUS
नवी मुंबईत सीबीडी बेलापूर सेक्टर 8 परिसरात पर्यटकांना वाचवण्यात यश

राज्यात अव्वल स्थान पटकविलेल्या भंडारा एस टी आगारात तब्बल 367 बसेस आहेत. 19 मालवाहतूक बस आहेत. जिल्ह्यात 277 बसेस सुरु असून तब्बल 90 बसेस आजही आगारात उभ्या आहेत. शासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वाढता फैलाव बघता एप्रिल महिन्यात लॉक डाउन घोषित केले.

राज्यात लॉकडाउन लागले की लोक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे एसटीचे चाके थांबते. गाड्या आगारात उभ्या असल्या तरी त्या नादुरुस्त होऊ नये. यासाठी इंजिन सुरू ठेवावे लागते. त्या थोड्याफार फिरवल्याही जातात. त्यासाठी आणि इतर खर्च तब्बल चार कोटी आला आहे. एकंदरीत एस टी महामंडळाला 15 एप्रिल तर 7 जूनपर्यतचा मेंटेनन्स खर्च तब्बल 4 कोटी रुपये आला आहे.

लॉकडाउनमध्ये एक रूपयाचे उत्पन्न नसताना भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात तब्बल चार कोटी रूपये मेंटेनन्स येत असेल तर एसटी किती घाट्यात जाते, याचाही सरकारने विचार करण्याची गरज आहे.

बस बंद असल्या तरी त्यांना फिरवून आणा लागत होते. अॉईलचा खर्च, टायरचा खर्च तसेच इतरही अनुषंगिक खर्च दरमहा येत होता. त्यामुळे प्रत्येक महिन्याला दोन कोटी रूपये खर्च करावे लागले.

- चंद्रकांत वडस्कर बाइट, विभागीय नियंत्रक,भंडारा.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com