माजलगावमधील धरण शंभर टक्के भरलं; तब्बल 11 दरवाजे उघडले

बीडच्या माजलगाव शहरालगत असणारे धरण शंभर टक्के भरले
माजलगावमधील धरण शंभर टक्के भरलं; तब्बल 11 दरवाजे उघडले
माजलगावमधील धरण शंभर टक्के भरलं; तब्बल 11 दरवाजे उघडलेविनोद जिरे

बीड : बीडच्या Beed माजलगाव Majalgaon शहरालगत असणारे धरण शंभर टक्के भरले असून, आज पहाटे 4 वाजल्यापासून धरणाचे dam तब्बल 11 दरवाजे Doors उघडण्यात आले आहेत. दीड मीटरने उघडण्यात आलेल्या या दरवाज्यातून 77 हजार 300 क्युसेस वेगाने सिंदफणा नदी Sindfana river पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.

हे देखील पहा-

शिरूर Shirur तालुक्यातील सिंदफणा प्रकल्प ओव्हरफ्लो Overflow झाल्यामुळे अगोदरच सिंदफणा नदीला कालपासून पुरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावातील पूल पाण्याखाली देखील गेली आहेत. हजारो हेक्टर शेतकऱ्यांची पिक नुकसान झाले आहेत. तर आता माजलगाव तालुक्यात धरणाखाली असणाऱ्या, अंधापुरी, रोशनपुरी, मनूर, गोविंदपूर, सांडस चिंचोली, ढेपेगाव, मंजरथ या गावांना पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे संबंधित ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com