NCP : भाजप नेत्याचा पाय माेडला, मारहाण प्रकरणी 'एनसीपी' च्या आमदारासह पत्नी, व्यापा-यावर गुन्हा दाखल

विधीमंडळाचे अधिवेशन सुरु असतानाच हा गुन्हा दाखल झाल्याने आता त्याचे पडसाद विधीमंडळातही उमटण्याची शक्यता आहे.
mla prakash solanke, beed
mla prakash solanke, beedsaam tv

Beed : आमदार प्रकाश सोळुंके (mla prakash solanke) यांच्या संस्थांमध्ये कोट्यावधींचा घोटाळा झाल्याचा आरोप करणारे भाजप नेते अशोक शेजुळ यांच्यावर तीन दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. या हल्ला प्रकरणी आता आमदार प्रकाश सोळुंके हे अडचणीत सापडले आहेत. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके हे बीड (beed) जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. (Maharashtra News)

mla prakash solanke, beed
Dhulivandan 2023 : प्रेम विवाह करणाऱ्या जावयाची पहिल्यांदाच गावातून वाजत गाजत मिरवणूक (पाहा व्हिडिओ)

भाजपा नेते अशोकराव शेजुळ (bjp leader ashokrao shejul) यांच्यावर माजलगाव शहरातील शाहूनगर येथे ते दुचाकीवरुन जात असताना मोटरसायकलवरून पाठीमागून आलेल्या पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर राॅडच्या व धारधार शस्त्राच्या साह्याने हल्ला चढवला.

यामध्ये त्यांच्या हातापायावर जबर मार लागला असून एक पाय मोडला आहे. त्यांच्या डोक्यावर देखील जबर मार लागला आहे. सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान हल्ला आमदार प्रकाश सोळंके यांनीच घडवून आणल्याचे अशोक शेजुळ यांनी सांगितल्यानंतर अखेर आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह पत्नी व इतरांवर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

mla prakash solanke, beed
Palghar : किडीच्या प्रादुर्भावामुळं पालघरातील मिरची संकटात; उत्पादन घटणार, शेतकरी चिंतेत

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार या हल्ला प्रकरणी आमदार प्रकाश सोळुंके यांच्यासह पत्नी मंगला सोळुंके, व्यापारी रामेश्वर टवानी व इतर चार ते पाच जणांवर माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com