डहाणू राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; विदेशी दारूसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

या प्रकरणी अधिक चौकशी करून असलेला दारू साठा मोकळीक मिळताच गुजरात दिशेने तस्करी करून नेला जाणार असल्याची माहिती पथकाला दिली.
Palghar News
Palghar NewsSaam Tv

पालघर - राज्य उत्पादन शुल्क डहाणू विभागाच्या पथकाने मुंबई (Mumbai) अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी जवळील आच्छाड जवळील ब्रदर्ष बियर शॉप जवळ पाठलाग करून विदेशी दारूसह २७ लाख २४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी जवळील आच्छाड काजळी येथून परराज्यातील मद्य वाहतुकीच्या संदर्भात मद्य तस्करी होणार ही माहिती राज्य उत्पादन शुल्क डहाणू निरीक्षक व त्यांचा पथकाला मिळली हाेती.

हे देखील पाहा -

या वेळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पाळत ठेऊन पथकाने पाठलाग करून कंटेनरची तपासणी केली. यावेळी तस्करीसाठी मद्याचा साठा लपवलेला मिळून आला. या प्रकरणी चालक सुधाकर पाटील यास अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक चौकशी करून असलेला दारू साठा मोकळीक मिळताच गुजरात दिशेने तस्करी करून नेला जाणार असल्याची माहिती पथकाला दिली.

Palghar News
Rajya Sabha Election: फाईव्ह स्टार हॉटेल सोडून संजय गायकवाड यांचा आमदार निवासात मुक्काम...

सदर तस्करीची कबुली चालकाने देताच कंटेनरचे सिल तोडले असता त्यात महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला व केंद्र शासित दादर नगर हवेली येथे विक्रीकरिता असलेला एकूण 210 बॉक्स विदेशी मद्य व बियर बॉक्स आणि ट्रक राज्य उत्पादन शुल्काने ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई डहाणू राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक महेश धनशेट्टी ,दुय्यम निरीक्षक किरण धिदले,एम एम मानकर आणि त्यांच्या जवानांनी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com